विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. २०२४ मध्ये पुन्हा नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान बनविण्यासाठी उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री होणे आवश्यक आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. This offer was made by Yogi Adityanath to the journalist after he asked why Owaisi and he dont retire from political life
याच दरम्यना एका पत्रकाराने योगी आदित्यनाथ यांना सल्ला दिलाकी तुम्ही आणि ओवेसी संन्यास घ्या. यावर योगी आदित्यनाथ हसत हसत म्हणाले, हे फक्त तुम्ही काश्मीरमध्ये जाऊन सांगा. आम्ही सरकारी खर्चाने तुम्हाला काश्मीरमध्ये उपदेशक म्हणून पाठवायलाही तयार आहोत.
एका वृत्तवाहिनीवर योगी आदित्यनाथ यांची मुलाखत व्हायरल होत आहे. यामध्ये मुलाखतकर्ता त्यांना म्हणतोय, तुम्ही आणि ओवेसी ज्या प्रकारचे राजकारण करत आहात त्यामुळे लोकांना भडकावण्याचे काम केले जात आहे, असे तुम्हाला वाटत नाही का? भारत हा एक शांतीप्रिय देश आहे.
तुम्ही आणि एएमआयएमआयचे असुद्दीन ओवेसी दोघांनीही राजकीय संन्यास घेतला तर देशावर मोठे उपकार होतील असे आपल्याला वाटत नाही का? यावर हसत हसत योगी आदित्यनाथ म्हणाले, तुम्ही खूप सुंदर विचार मांडता. हिच गोष्ट तुम्ही काश्मीरमध्ये जाऊन समजावून सांगितली तर खूप चांगला होईल. आम्ही तुम्हाला एका उपदेशक म्हणून काश्मीरमध्ये पाठविण्यास तयार आहोत.
संन्यासी असूनही आपल्याकडे एक लाखाचे पिस्तुल आणि ८० हजार रुपयांची रायफल का आहे? आमच्यासारख्यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी ही शस्त्रे आहेत का? या प्रश्नावर योगी आदित्यनाथ म्हणाले, एक संन्यासी असल्याने शास्त्र आणि शस्त्र दोन्हींचे प्रशिक्षण आम्हाला मिळाले आहे. दोन्हीही सोबत ठेवतो. मात्र, आपल्यासारख्यांना या शस्त्रांची भीती बाळगण्याची गरज नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App