हा देश हिंदूंचा अपमान सहन नाही करणार, काँग्रेस आणि इको सिस्टीमला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर; मोदींचा इशारा!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेस आणि त्यांचे चेले चपाटे मित्र हिंदू धर्माचा अपमान करतात. हिंदू धर्माची तुलना डेंग्यू, मलेरियाशी करतात. हिंदू समाजाला हिंसक म्हणतात. पण हा देश हिंदूंचा अपमान सहन करणार नाही. काँग्रेस आणि त्यांच्या इकोसिस्टीमला इथून पुढच्या काळात त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर मिळेल, असा खणखणीत इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत दिला. This country will not tolerate insulting Hindus

“बालक बुद्धी” असे म्हणत पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींच्या कालच्या हिंदू विरोधी भाषणाचे अक्षरशः वाभाडे काढले. राहुल गांधींनी 90 मिनिटांच्या केलेल्या भाषणाला पंतप्रधान मोदींनी प्रखर शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिले. पण मोदींचे उत्तर ऐकण्याचे धैर्य काँग्रेस आणि विरोधकांकडे नव्हते. त्यामुळे त्यांनी मोदी बोलत असताना सतत गदारोळ चालू ठेवला, पण या गदारोळ्यात देखील मोदींनी आपले म्हणणे ठासून मांडले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू होताच विरोधकांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सभागृहात प्रचंड गदारोळ केला. यावेळी विरोधकांनी प्रचंड घोषणाबाजी करत सभागृह डोक्यावर घेतले. त्यामुळे मोदींनाही भाषण करणं मुश्किल झाले होते. तरीही मोदींनी माघार घेतली नाही. त्यांनी कानाला हेडफोन लावून भाषण करून काँग्रेस आणि त्या पक्षाच्या इको सिस्टीम वर जोरदार प्रहार केले केलं. मोदींनी काँग्रेसवर अनेक गंभीर आरोप करताना काँग्रेसचा पर्दाफाशही केला. जेव्हा मोदी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलायला लागले, तेव्हा विरोधकांना झूठ बोले कौआ काटे म्हणत जोरजोरात बोंब ठोकली.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले होते. तिसऱ्यांदा सत्ता आल्यानंतर सभागृहात बोलण्याचा नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच प्रसंग होता. मोदी बोलण्यास उभे राहताच विरोधकांनी एकच गोंधळ सुरू केला. मणिपूरच्या हिंसेवर बोला, असा आग्रहच विरोधकांनी धरला. ‘नही चलेगी नही, चलेगी दादागिरी नही चलेगी’, ‘नही चलेगी नही चलेगी, हुकूमशाही नही चलेगी’, ‘मणिपूर के लिए शेम शेम’, अशा घोषणा विरोधकांनी द्यायला सुरुवात केली. मणिपूरवर बोलण्याचा आग्रही विरोधकांनी धरला. पण मोदींनी त्याविषयावर एक शब्दही काढला नाही. त्यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप करत लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या कामगिरीची चिरफाड केली.

हा हिंदूंचा अपमान

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल लोकसभेत हिंदुत्वाचा मुद्दा काढून हिंदूंना हिंसक अशा शब्दांमध्ये हिणवले होते. या मुद्द्यावरून मोदींनी राहुल गांधी यांना पुरते घेरले. काँग्रेसकडून हिंदूंना हिंसक म्हटलं गेलं. हा हिंदूंचा अपमान आहे. राजकारणासाठी राहुल गांधी हिंदूंची चेष्टा करत आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणायला लागले. त्यावेळी विरोधकांनी झूठ बोले कौआ काटे म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. विरोधक वारंवार झूठ बोले कौआ काटे म्हणत होते. तसेच बंद करो, बंद करो अशा घोषणाही दिल्या जात होत्या. मात्र मोदी यांनीही आपलं भाषण सुरूच ठेवलं होतं.

हिंदूचा अपमान सहन करणार नाही

काँग्रेसचे साथीदार हिंदूंची तुलना डेंग्यू, मलेरियाशी करतात. हिंदूंच्या बदनामीचा हा पूर्वनियोजित कट आहे. हिंदूना हिणवलं हेच का तुमचे संस्कार? हिंदू सहनशील आहेत म्हणून भारताची लोकशाही जिवंत आहे. हिंदू देवतांचा अपमान सहन करणार नाही. काँग्रेस आणि त्यांच्या इकोसिस्टीमला त्यांच्याच परखड भाषेत प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराच मोदींनी यावेळी दिला.

हार स्वीकारा

2024च्या निवडणुकीत काँग्रेससाठीही लोकांनी कौल दिला आहे. जनतेचा कौल हा आहे की, तुम्ही तिथेच बसा. विरोधातच बसा. आणि ओरडत बसा. सलग तीनवेळा काँग्रेस 100 चा आकडा पार करू शकली नाही, ही काँग्रेसच्या इतिहासातील पहिली वेळ आहे. काँग्रेसच्या इतिहासातील त्यांची ही तिसरी सर्वात मोठी हार आहे. तिसरं सर्वात वाईट प्रदर्शन आहे. काँग्रेसने आपला पराभव स्वीकार केला असता, जनतेचा आशीर्वाद स्वीकारला असता. आणि मंथन केलं असतं, तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती. पण हे तर शीर्षासन करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

मुलगा आणि सायकलचा किस्सा

त्यांनी आम्हाला पराभूत केलंय हे काँग्रेस आणि त्यांची इको सिस्टिम दिवस रात्र हिंदुस्थानच्या नागरिकांच्या मनात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. असं का होत आहे?? मी माझ्या आयुष्यातील एक अनुभव सांगतो. एक छोटा मुलगा सायकल घेऊन जातो. तो सायकलवरून पडतो आणि रडायला लागतो. तेव्हा एक मोठा माणूस म्हणतो, बघ पक्षी मेला, मुंगी मेली. तू चांगली सायकल चालवतो. तू पडला नाही. त्याचा धीर वाढवण्याचा प्रयत्न करतो. त्याचं ध्यान भरकटवण्याचं प्रयत्न करतो. आजही या लहान मुलांचं मन भरकटवण्याचं काम सुरू आहे, असा टोला त्यांनी लगावला.

काँग्रेससाठी त्यांची इको सिस्टिम मन भरकटवण्याचं काम करत आहे. 1984ची निव़डणूक आठवा. त्यानंतर 10 लोकसभा निवडणुका झाल्या. या 10 निवडणुकांमध्ये काँग्रेस 250 चा आकडा गाठू शकली नाही. यावेळी कसाबसा 99 चा आकडा गाठलाय, पण त्यांना वाटते आम्ही जिंकलो पण त्यांचे शंभर पैकी 99 मार्क आलेले नाहीत 543 पैकी 99 मार्क आलेत हे ते विसरलेत ते आपल्या पराभवाचेच पेढे वाटत सुटलेत, असा चिमटाही मोदींनी काढला.

अराजकता निर्माण करणार होते

काँग्रेस देशात आर्थिक अराजक फैलवण्याच्या बेतात आहे. ज्या पद्धतीने ते खैरात वाटण्याची पावले उचलत आहेत, तो रास्ता देशाला आर्थिक अराजकतेकडे नेण्याचा आहे. त्यांच्या नेतृत्वातील राज्य देशावर आर्थिक बोजा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मनासारखा निकाल आला नाही. 4 जून रोजी देशात आग लावली गेली असती. लोकं एकत्र करणार होते. त्यांना आगी लावून अराजकता निर्माण करायची होती. हा अराजकता निर्माण करणं यांचा हेतू आहे. त्यांचे राजकीय हेतू पूर्ण करण्यासाठी त्यांची इको सिस्टिम तयार होती. आजकाल सिंपथी गेन करण्याची नौटंकी सुरू झाली आहे. नवीन खेळ खेळला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींच्या भाषणाची अक्षरशः पिसे काढली.

This country will not tolerate insulting Hindus

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात