अमृतसरमध्ये 5 दिवसांत तिसरा बॉम्बस्फोट, 5 जणांना अटक, बॉम्ब बनवणारे निघाले नवशिके

वृत्तसंस्था

अमृतसर : पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराजवळ गुरुवारी आणखी एक स्फोट झाला. स्फोटामुळे परिसरात घबराट पसरली. अमृतसरमध्ये 5 दिवसांत तीन कमी-तीव्रतेच्या स्फोटांप्रकरणी पंजाब पोलिसांनी नवीन स्थानिक दहशतवादी नेटवर्कशी संबंधित 5 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉम्ब बनवणारे नवखे होते आणि सुवर्ण मंदिराभोवती स्फोट घडवून पंजाबमध्ये अशांततेचे वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश होता. लवकरच पंजाब पोलीस पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणी महत्त्वाचे खुलासे करणार आहेत. पोलिसांनी अमृतसर येथून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.Third bomb blast in 5 days in Amritsar, 5 people arrested, bomb makers turned out to be novices

तिसरा स्फोटही सुवर्ण मंदिराजवळ

तिसरा स्फोट कॉरिडॉरच्या बाजूला असलेल्या श्री गुरु रामदास सराईजवळ रात्री 1 वाजता सुवर्ण मंदिराजवळ झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. या स्फोटाचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक बाहेर आले. तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली, त्यानंतर फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली.



मात्र, स्फोटाची ही जागा पहिल्या स्फोटाच्या ठिकाणापेक्षा पूर्णपणे वेगळी होती. हा ताजा स्फोट पहिल्या घटनास्थळापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अमृतसर येथून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. पंजाब पोलिस गुरुवारी सकाळी 11 वाजता याप्रकरणी पत्रकार परिषद घेणार आहेत. डीजीपी गौरव यादव या परिषदेला संबोधित करू शकतात.

शनिवारी संध्याकाळीही झाला होता स्फोट

गेल्या शनिवारीही सुवर्ण मंदिराच्या पार्किंगमध्ये बांधलेल्या रेस्टॉरंटमध्ये स्फोट झाला होता. तेव्हा पोलिसांनी तो चिमणी स्फोट असल्याचे सांगितले. शनिवारच्या बॉम्बस्फोट प्रकरणात पंजाब पोलिसांचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. तडकाफडकी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस पथकाने हा स्फोट रेस्टॉरंटच्या चिमणीच्या स्फोटामुळे झाल्याचे सांगितले. यानंतर ना संपूर्ण परिसर सील करण्यात आला ना परिसर झाकून मार्किंग करण्यात आले. एवढेच नव्हे तर फॉरेन्सिक तपासणीसाठीही हा परिसर तातडीने सील करण्यात आलेला नाही. स्फोटाच्या ठिकाणी पोलीस कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांचे जोडे घालून फिरत असल्याने फॉरेन्सिक टीमला स्फोटात वापरलेल्या रसायनाचे नमुने घेण्यात अडचण येत आहे.

आयईडी स्फोट

यानंतर सोमवारी झालेल्या स्फोटात ही स्फोटके धातूच्या कप्प्यात ठेवण्यात आली होती आणि पोलिसांनी घटनास्थळावरून अनेक धातूचे तुकडे जप्त केले. पोटॅशियम नायट्रेट आणि सल्फरचा वापर करून इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (आयईडी) द्वारे हा स्फोट घडवून आणण्यात आल्याचा संशय आहे. हेरिटेज पार्किंग लॉटमध्ये स्फोटक (बॉम्ब) टांगण्यात आले होते आणि तिथेच हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक एफएसएल पथकाने घटनास्थळी पोहोचून नमुने गोळा केले आहेत.

शनिवारी झालेल्या स्फोटानंतर तेथे उपस्थित भाविक भयभीत झाले. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणापासून सुवर्णमंदिर अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे. स्फोटाची तीव्रता इतकी होती की काही घरांच्या खिडक्यांच्या काचाही तुटल्या.

Third bomb blast in 5 days in Amritsar, 5 people arrested, bomb makers turned out to be novices

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात