विशेष प्रतिनिधी
चेन्नई : नुकताच कंगना राणावतचा ‘थलाईवी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री डॉ. जयललिता यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. भारतीय राजकारणातील सर्वात प्रभावशाली व्यक्तीपैकी एक असलेल्या जयललिता हे एक सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व होते. आयुष्यात आलेल्या प्रत्येक वादळाला आत्मविश्वासाने सामोरे जाणे, सर्वकाही संपलेले असताना स्वतच्या प्रयत्नांवर विश्वास ठेऊन आयुष्य उभं करण काय असत हे त्यांच्या आयुष्याकडे पहिले कि लक्षात येईल. या सिनेमानंतर जयललिता यांच्याविषयीची उत्सुकता आणि आदर नक्कीच वाढला असणार. जयललिता यांचा राजकीय प्रवास तुम्हाला माहीत असणारच. चला तर जाणून घेऊया जयललिता यांच्या आयुष्यातील अशा काही गोष्टी ज्या त्यांनी स्वतः सिमी गरेवालच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितल्या होत्या.
Things Jayalalitha revealed on rendezvous with simi show
आईच्या आठवणी :
जयललिता यांची आई तमिळ चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून काम करायची. अगदी लहान वयात विधवा झाल्यामुळे त्यांच्यावर दोन्ही मुलांची जबाबदारी घेण्याची वेळ आली होती. म्हणून त्यांनी तामिळ सिनेमात काम करण्यास सुरुवात केली होती. जेव्हा त्या शूटिंगला जात तेव्हा आपल्या मुलांना त्या आपल्या आईवडिलांकडे बेंगलोरमध्ये ठेवून मद्रासला जायच्या.
जयललिता आपल्याला बालपनाची सर्वात प्रकर्षाने आठवणारी आठवण सांगताना सांगतात की,’आईला जेव्हा परत शूटिंगला जायचे असायचे त्यावेळी मी तिच्या साडीचा पदर घट्ट धरून ठेवायचे,जेणेकरून ती मला सोडून जाऊ नये. आई परत गेल्यानंतर पुढचे तीन दिवस नुसते रडण्यात जायचे’
Tamilnadu Assembly Elections 2021 : अम्मा नाहीत, करूणानिधी नाहीत; मोदी – शहा आहेत!!
शालेय जीवन :
तमिळनाडूमधील अय्यंगर फॅमिलीमध्ये त्यांचा जन्म झाला असला तरी घरची परिस्थिती म्हणावी तितकी चांगली नव्हती. त्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये त्या शिकायला होत्या. तेव्हा शाळेतील त्यांच्या मैत्रिणी त्यांची आई सिनेमांमध्ये आईचा, बहिणीचा रोल करते म्हणून त्यांना कमी लेखायच्या. याविषयी जयललिता म्हणतात की, जर माझ्या आईने लीड रोल कॅरेक्टर प्ले केले असते तर सर्वांनी मला डोक्यावर उचलून धरले असते. पुढे त्या म्हणतात की, या सर्व टॉर्चरचा बदला म्हणूनच की काय मी शाळेमध्ये दरवेळी पहिली यायचे. मी अभ्यासामध्ये हुशार होते.
जयललिता यांना वकील बनण्याची इच्छा होती किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये रिसर्च करण्याची त्यांची इच्छा होती. पण घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे त्यांना 12 नंतर शिक्षण अर्ध्यावर सोडून अभिनय क्षेत्रामध्ये काम करावे लागले होते.
शालेय जीवनात जयललितांचे क्रश कोण होते?
क्रिकेटर नारी कॉन्ट्रॅक्टर आणि सिनेअभिनेते शम्मी कपूर यांच्यावर त्यांना सर्वात मोठे क्रश होते. शम्मी कपूर यांचा जंगली सिनेमा त्यांचा सर्वात आवडता सिनेमा होता. या मुलाखती मध्ये जयललिता यांनी ‘आजा सनम मधुर चाँदनी मै’ हे गाणे देखील गायले होते. सुनील दत्त यांनी त्यांच्या इज्जत या सिनेमामध्ये लीड कॅरेक्टर प्ले करण्यासाठी जयललिता यांना ऑफर दिली होती. पण तारखांचा मेळ जुळून न आल्यामुळे त्यांना हा सिनेमा करता आला नव्हता.
एमजीआर यांच्याबद्दल :
जयललिता फक्त तेवीस वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले होते. तेव्हा त्यांच्या आयुष्यातील त्यांच्या आईची जागा एमजीआर यांनीच घेतली होती, असे त्यांनी स्वतः सिमी गरेवालच्या मुलाखतीमध्ये सांगितले हाेते. एमजीआर आणि जयललिता यांच्या नात्यावरून बऱ्याच चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. एमजीआर हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री होते.
राजकीय क्षेत्रातील प्रवेश :
एमजीआर यांनीच जयललिता यांना राजकारणात संधी दिली होती. एमजीआर यांना जयललिता राजकीय गुरू मानायच्या. यांच्या निधनानंतर त्यांनी राजकीय क्षेत्रातून एक्झिट घेण्याचा विचार केला होता. पण पार्टीच्या काही सदस्यांनी त्यांना एमजीआर यांची जागा घेण्यास भाग पाडले होते. एमजीआर यांच्यानंतर जयललिता की एमजीआर यांची पत्नी जानकी, यांच्यापैकी राजकीय वारस कोण? यावरून बरेच वाद त्यावेळी निर्माण झाले होते.
लग्नाविषयी :
जयललिता आजन्म अविवाहित राहिल्या. सिमी गरेवाल यांनी या बद्दल जेव्हा जयललिता यांना विचाराले होते तेव्हा त्यांनी ‘आयुष्यात कुणीही परफेक्ट माणूस, ज्याच्यासोबत लग्न करावेसे वाटेल असा भेटला नाही. त्यामुळे लग्न ही गोष्ट माझ्या आयुष्यात झाली नाही’ असे सांगितले होते.
शशिकला यांची मैत्री:
जयललिता आणि शशिकला यांच्या मैत्रीवरही बरेच वाद मध्ये निर्माण झाले होते. शशिकला यांच्या विषयी त्यांनी असे सांगितले होते की, ‘माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आईची जागा शशिकला यांनी घेतली आहे. घरातील छोट्या मोठ्या गोष्टी सांभाळन्यापासून ते मला राजकीय गोष्टींमध्ये निर्णय घेण्यापर्यंत सर्व मदत शशिकला करतात’. असे त्यांनी या इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App