Population control : आसाममध्ये लोकसंख्या नियंत्रणासाठी बजेटमध्ये मोठ्या तरतूदी; ऐच्छिक नसबंदीला प्रोत्साहन; मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मांची घोषणा

वृत्तसंस्था

गुवाहाटी – आसाममध्ये लोकसंख्या नियंत्रणाचा विषय मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी आपल्या टॉप अजेंड्यावर आणला आहे. राज्यात लोकसंख्या नियंत्रणासाठी अर्थसंकल्पात मोठ्या योजनांच्या घोषणा करण्याचे जाहीर केले आहे. There will be some big announcements in the Budget session regarding voluntary sterilisation and population control measures

यामध्ये काही सरकारी योजना फक्त दोन मुले असलेल्या कुटुंबांसाठीच लागू करण्याच्या तसेच काही निवडक योजना सर्वांसाठी लागू करण्याच्या ठळक तरतूदी असतील, असे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी स्पष्ट केले आहे.



लोकसंख्या नियंत्रणासंबंधीच्या उपाययोजना आणि स्वतःच्या इच्छेने नसबंदी करून घेणाऱ्या व्यक्तींसाठी खास योजना अर्थसंकल्पात जाहीर करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यापूर्वी, हेमंत विश्वशर्मा यांनी अल्पसंख्याक समूदायातील १५० कलावंत, साहित्यिक, विचारवंत तसेच डॉक्टर, वकील अशा मान्यवरांसमोर लोकसंख्या नियंत्रणाचा विषय खुलेपणाने मांडला होता. आसामी वंशाच्या मुसलमानांची संख्या बाहेरच्या विशेषतः बांगलादेशातून येणाऱ्या मुसलमानांच्या तुलनेत कमी होत चाललेल्या घटनेचे गांभीर्य हेमंत विश्वशर्मा यांनी या १५० जणांच्या समूहास लक्षात आणून दिले होते.

त्याचवेळी त्यांनी या विचारवंत – कलावंत आणि व्यावसायिकांकडून लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात सूचनाही मागविल्या होत्या. यातील निवडक सूचनांचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात येणार आहे. ऐच्छिक नसबंदीला प्रोत्साहन देणे तसेच त्यासाठी काही सवलती देणे हा या सूचनांचा एक भाग आहे.

 

There will be some big announcements in the Budget session regarding voluntary sterilisation and population control measures

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात