न्यूझीलंडचा व्लॉगर कार्ल रॉक भारतात ब्लॅकलिस्ट, Visa नियमांच्या उल्लंघनाचा आरोप

New Zealand vlogger Carl Rock blacklisted in India, accused of violating visa norms

New Zealand vlogger Carl Rock : न्यूझीलंडमध्ये जन्मलेला व्लॉगर कार्ल रॉक याने अनेक व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल भारत सरकारने त्याला काळ्या यादीत टाकले आहे. व्लॉगर कार्ल रॉक पर्यटक व्हिसावर व्यवसाय करताना आढळला आहे. यानंतर त्याच्यावर एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली असून त्याचा व्हिसादेखील रद्द करण्यात आला आहे. ही माहिती एमएचएच्या अधिकाऱ्याने एएनआयला दिली आहे. New Zealand vlogger Carl Rock blacklisted in India, accused of violating visa norms


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : न्यूझीलंडमध्ये जन्मलेला व्लॉगर कार्ल रॉक याने अनेक व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल भारत सरकारने त्याला काळ्या यादीत टाकले आहे. व्लॉगर कार्ल रॉक पर्यटक व्हिसावर व्यवसाय करताना आढळला आहे. यानंतर त्याच्यावर एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली असून त्याचा व्हिसादेखील रद्द करण्यात आला आहे. ही माहिती एमएचएच्या अधिकाऱ्याने एएनआयला दिली आहे.

यूट्यूबरचा आरोप कोणत्याही कारणाशिवाय केले ब्लॅकलिस्ट

यापूर्वी व्लॉगर कार्ल रॉकने असा दावा केला होता की, दुबई आणि पाकिस्तानच्या प्रवासासाठी भारत सोडल्यानंतर कोणतेही कारण न देता सरकारने त्याला काळ्या यादीत टाकले आहे. कार्ल रॉक म्हणाला की, त्याची पत्नी मनीषा मलिक हरियाणाची असून त्यांना काळ्या यादीत टाकून सरकारने त्याची पत्नीपासून व कुटुंबापासून ताटातूट केली आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिन्डा आर्डर्न यांना उद्देशून केलेल्या ट्विटमध्ये कार्ल रॉकने त्याचा “संघर्ष” आणि यासंदर्भात सुरू केलेल्या याचिकेवर प्रकाश टाकला. ट्विटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह ज्येष्ठ मुत्सद्दी, पत्रकार यांच्या अधिकृत हँडल्सनाही त्याने टॅग केले आहे.

यूट्यूबर कार्ल रॉकचे हरियाणाच्या मनीषाशी लग्न

यूट्यूबर कार्ल रॉक मूळचा न्यूझीलंडचा असून त्याचे लग्न भारतात झाले आहे. भारत आणि न्यूझीलंडदरम्यान कार्ल रॉकचा दौरा कायम आहे. त्याच्या यूट्यूब वाहिनीवरून पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये व्लॉगरने असा दावा केला आहे की, त्याने आपल्या पत्नीला 269 दिवसांपासून ​​पाहिलेले नाही.

कार्ल रॉकची ऑनलाईन याचिका

कोरोनाव्हायरस आजारातून बरे झाल्यावर प्लाझ्मा दान केल्याने केजरीवाल यांनी कार्ल रॉकचे कौतुक केले होते. आता कार्ल रॉकने ऑनलाईन याचिका सुरू केली असून असा आरोप केला आहे की, भारत सरकारने त्याला चुकीच्या पद्धतीने ब्लॅकलिस्ट केले आणि भारतात परतण्यास मज्जाव केला आहे.

New Zealand vlogger Carl Rock blacklisted in India, accused of violating visa norms

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*