देशात तिसरी आघाडी उभे राहणे शक्य नाही; मोदींना भेटून आल्यानंतर नवीन पटनाईकांचा विरोधी ऐक्याला सुरुंग

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात तिसरी आघाडी उभे राहणे शक्य नाही, अशा स्पष्ट शब्दांत ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी राजधानी नवी दिल्लीतून विरोधी पक्षांच्या ऐक्याला सुरुंग लावला आहे.There is no possibility of a Third front as far as I am concerned: Odisha CM Naveen Patnaik after his meeting with PM Narendra Modi

एकीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आजच महाराष्ट्रात येऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली. देशपातळीवरच्या विरोधी ऐक्यासाठी त्या दोन्ही नेत्यांशी चर्चा केली आणि दुसरीकडे नवीन पटनाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर देशात तिसरी आघाडी उभी राहणे शक्य नसतेचे वक्तव्य केले.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरचा निकाल लागत असताना नितीश कुमार आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे दोन्ही नेते आज मुंबईत होते. त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेतली. देशातल्या सर्व विरोधी पक्षांचा शरद पवार हे “चेहरा” बनू शकतात का?, असा प्रश्न पत्रकारांनी नितीश कुमार यांना पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी विचारला. त्यावर सध्या “विरोधकांचा चेहरा” या विषयावर चर्चा झाली नाही, तर फक्त विरोधकांच्या ऐक्याविषयी चर्चा झाली, असे उत्तर पवारांनी दिले.

पण मुंबईत विरोधी पक्षांचा ऐक्याचे असे मंथन सुरू असताना दुसरीकडे ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. ओरिसातील जगन्नाथ पुरीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळा संदर्भात त्यांनी मोदींशी चर्चा केली. त्यानंतर तिसऱ्या आघाडीच्या संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर तशी आघाडी उभे राहणे शक्य नाही. आपला त्या आघाडीशी काही संबंध नाही, असे उत्तर देऊन पटनाईक निघून गेले.

म्हणजे इकडे नितीश कुमार, ठाकरे आणि पवार मुंबईत विरोधी पक्षांचे ऐक्य साधत असताना तिकडे दिल्लीत नरेंद्र मोदींनी न बोलता आणि नवीन पटनाईक यांनी बोलून त्या ऐक्याला सुरुंग लावला.

There is no possibility of a Third front as far as I am concerned: Odisha CM Naveen Patnaik after his meeting with PM Narendra Modi

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात