संघात एककल्ली उजव्या विचारसरणीला थारा नाही; अनेक संकल्पना डाव्या विचारसरणीतूनही घेतल्यात; सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांचे प्रतिपादन


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघात एकारलेल्या किंवा एककल्ली उजव्या विचारसरणीला थारा नाही. संघात आम्ही कधीही उजव्या विचारसरणीचे आहोत, असे म्हटलेले नाही. उलट अनेक संकल्पना डाव्या विचारांतूव आम्ही स्वीकारल्या आहेत, असे नि:संदिग्ध प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी केले आहे. There is no one-sided right-wing ideology in the team; Many concepts are also taken from leftist thinking; Statement by Govt. Dattatraya Hosballe

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ कार्यकर्ते राम माधव यांनी लिहिलेल्या हिंदुत्व विषयक पुस्तकाचे प्रकाशन होसबळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी आपले विचार व्यक्त केले. भारतीय संस्कृतीला कुठेच पूर्णविराम नाही. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे संघाच्या विचारसरणीला देखील, असे कोणतेही बंधन नाही. आम्ही संघात कधीही एककल्ली, एकारलेल्या उजव्या विचारसरणीला थारा दिलेला नाही. काळाच्या आवश्यकतेनुसार आणि भारतीय भू राजनैतिक गरजेनुसार जी विचारसरणी आवश्यक आहे त्यानुसार पुढे चालले पाहिजे, असे आम्ही मानतो असे प्रतिपादनही होसबळे यांनी केले.



जगातली कोणतीही राजकीय आणि सामाजिक प्रणाली ही मानवी अनुभवांचा एक भाग असते. अनुभवातून ती विचारसरणी आकार घेत असते, असे संघ मानतो याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

आर्थिक सुधारणा उत्तर काळात तसेच मुक्त अर्थव्यवस्थेने वेग पकडल्यानंतर जगात पौर्वात्य आणि पाश्चिमात्य उजव्या आणि डाव्या अशा पद्धतीच्या राजकीय विचार प्रणाली मांडणीतील सीमारेषा पुसट झाल्या आहेत भारतीय गरजेनुसार आपणही बदलले पाहिजे अशी संघाची धारणा आहे अशी विचार मांडणी देखील दत्तात्रय होसबळे यांनी केली.

There is no one-sided right-wing ideology in the team; Many concepts are also taken from leftist thinking; Statement by Govt. Dattatraya Hosballe

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात