“हिंदुहृदयसम्राट”वर कधी वाद नाही, पण “हिंदू जननायका” वरून घरातच वाद!!


  • भावाकडून भावाच्या सुरक्षेत किंचित वाढ!!

स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदुहृदयसम्राट होते. त्यांना भारतातील जनतेला हिंदुहृदयसम्राट असेच नेहमी संबोधले. दिल्लीच्या एका भव्य कार्यक्रमात आर्य समाजाने सावरकरांना हिंदुहृदयसम्राट अशी पदवी प्रदान केली होती. सावरकरांच्या अखंड भारत मोहिमेची हिंदू समाजाने दिलेली ती कृतज्ञतेची पोहोचपावती होती.
There is never a dispute over “Hindu Heart Emperor”, but there is a dispute over “Hindu Jananayaka” at home

त्यानंतर बाळासाहेब ठाकरे हे हिंदुहृदयसम्राट झाले. 1986 मध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाळासाहेबांनी निवडणूक गाजवली आणि जिंकली. त्यानंतर त्यांचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट असा करण्यात येऊ लागला. जनतेने मनापासून सावरकरांनंतर ही पदवी बाळासाहेबांना दिली होती. मात्र त्यांच्या नंतर संपूर्ण देशात हिंदुत्ववाद्यांची पूर्ण बहुमताची सत्ता येऊनही कोणी हिंदुहृदयसम्राट उरला नाही…!! पण आता “खरा” हिंदू जननायक कोण??, यावर मात्र एकाच घराण्यात वाद उत्पन्न झाला आहे.

मनसैनिकांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची हिंदू जननायक अशी प्रतिमा तयार केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेने देखील बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही उल्लेख हिंदू जननायक असा करायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच शिवसेना आणि मनसे या ठाकरे घराण्याच्या पक्षांमध्ये वाद निर्माण झाला आहे. राज ठाकरे यांची हिंदू जननायक ही पदवी शिवसेनेने चोरल्याचा आरोप मनसैनिकांनी केला आहे.

राज ठाकरे यांच्या सभेचे टीझर हिंदू जननायक नावाने प्रसिद्ध केले होते. उद्या 14 मे रोजी वांद्रे-कुर्ला संकुलात होणाऱ्या मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना संपर्क मेळाव्याचा टीझर शिवसेनेचे शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव पाटील आढळराव यांनी केला आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांना हिंदू जननायक असे संबोधले आहे. नेमका याच वरून ठाकरे घराण्याच्याच शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांमध्ये वाद उत्पन्न झाला आहे.

– धमकीनंतर सुरक्षेत किंचित वाढ

पण या वादाच्या पलिकडे जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत किंचित वाढ केली आहे. राज ठाकरे यांना मारण्याची धमकी आल्यानंतर पोलिसांना अलर्ट वर ठेवले आहे. राज ठाकरे यांची “वाय प्लस दर्जाची” सुरक्षा कायम ठेवून त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील पोलिसांची संख्या वाढवली आहे. त्यांना एक अतिरिक्त अधिकारी आणि काही पोलीस जवान यांची जादा सुरक्षा पुरविण्यात येणार आहे.

There is never a dispute over “Hindu Heart Emperor”, but there is a dispute over “Hindu Jananayaka” at home

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात