वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आसाम, उत्तर प्रदेश या राज्यांचे लोकसंख्या नियंत्रण धोरण जाहीर होत असतानाच केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देशात जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. There is a need for caste-based census to figure out the community-wise population… This will also help avail social, economic & academic benefits to the needy: Union Minister Ramdas Athawale
देशात लोकसंख्या नियंत्रणात आणणे तर आवश्यक आहेच. परंतु, सरकारी सवलतींचे वाटप योग्य प्रमाणात करण्यासाठी जातीनिहाय जनगणनेचा उपयोग होऊ शकेल, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, की सरकार समाजातल्या दुर्बल घटकांना सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक लाभ देते ये योग्य आणि गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचले पाहिजेत. जातीनिहाय जनगणना केली की कोणत्या समाजाचे लोकसंख्येत किती प्रमाण आहे हे समजून येईल. गरजेनुसार सोयी – सवलतींची फेररचना देखील करता येऊ शकेल, असे आठवले म्हणाले.
There is a need for caste-based census to figure out the community-wise population… This will also help avail social, economic & academic benefits to the needy: Union Minister Ramdas Athawale (11.07) pic.twitter.com/EjUSA9SiFF — ANI (@ANI) July 12, 2021
There is a need for caste-based census to figure out the community-wise population… This will also help avail social, economic & academic benefits to the needy: Union Minister Ramdas Athawale (11.07) pic.twitter.com/EjUSA9SiFF
— ANI (@ANI) July 12, 2021
आसाम आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांनी जाहीर केलेल्या लोकसंख्या धोरणाच दोन मुले प्रणालीला प्रोत्साहन देण्यात आले आहे. दोन पेक्षा अधिक मुले असणाऱ्या व्यक्तींना आणि कुटुंबांना सरकारी सवलती देण्यात येणार नाही अशा प्रकारच्या त्या धोरणात तरतूदी आहेत. या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे, त्याला राजकीय आणि सामाजिक महत्त्व आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App