वृत्तसंस्था
बेंगळुरू – कर्नाटकात सत्ताधारी भाजपच्या अंतर्गत वादामुळे केंद्रीय नेतृत्वाने हस्तक्षेप केला खरा. पण आज दिवसभरात बैठका घेऊन राज्यातील नेतृत्व बदलाच्या मुद्द्यावर पडदा टाकला. There are no differences in the party and we are united. Commendable work is being done under CM Yediyurappa’s leadership: BJP’s Karnataka in-charge Arun Singh, in Bengaluru
भाजपचे कर्नाटक प्रभारी अरूण सिंग यांनी आज दिव सभर राजधानी बेंगळुरूमध्ये बैठकांचा धडाका लावला होता. त्यामध्ये भाजपचे मंत्री इश्वरप्पा, बसवराज पाटील यांच्या सह अनेक मंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन आपापली मते अरूण सिंग यांच्या कानावर घातली.
शेवटी सायंकाळी मुख्यमंत्री येडियुरप्पांच्या उपस्थितीत अरूण सिंग यांनी भाजपच्या आमदार आणि मंत्र्यांची एकत्र बैठक घेतली. त्यांना केंद्रीय नेतृत्वाचा संदेश सांगितला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अरूण सिंग यांनी कर्नाटकात कोविड काळात येडियुरप्पा यांच्या कारकिर्दीत सरकारने उत्तम काम केल्याचा निर्वाळा दिला.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी कोविड काळात भरपूर जनसेवेची कामे केली. त्याचा आढावा घेण्यासाठी मी आलो होतो. सरकारच्या विविध उपक्रमांचा देखील आढावा घेतला. सिंगल यूज प्लॅस्टिकसारखे उपक्रम राबविण्यावर भर दिल्याचे सांगण्यात आले. २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. तेव्हा किती व्यापक प्रमाणात कार्यक्रम घेता येतील, याचाही आढावा घेतला, असे अरूण सिंग यांनी स्पष्ट केले.
Bengaluru | A meeting, of Karnataka Chief Minister BS Yediyurappa, state BJP in-charge Arun Singh, and other state ministers, was held at the party's state office, earlier today pic.twitter.com/Eotga2WDxt — ANI (@ANI) June 16, 2021
Bengaluru | A meeting, of Karnataka Chief Minister BS Yediyurappa, state BJP in-charge Arun Singh, and other state ministers, was held at the party's state office, earlier today pic.twitter.com/Eotga2WDxt
— ANI (@ANI) June 16, 2021
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App