वृत्तसंस्था
नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन युद्धामुळे अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकले. त्यांची सुटका केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा अंतर्गत केली. जम्मू काश्मीरमधील एका तरुणाची अशीच सुटका करण्यात आली. तेव्हा त्याच्या वडिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. तसेच आता हा माझा मुलगा नसून मोदींचा आहे, असे त्यांनी सांगितले. The youth in Kashmir returned safely from Ukraine; The father thanked Prime Minister Narendra Modi
युक्रेन युद्धभूमीत हा विद्यार्थी अडकला होता. तो परत येण्याची आशा आम्ही जवळजवळ सोडलीच होती. पण, ऑपरेशन गंगा मुळे आमचा मुलगा सुखरूप परतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे हे सर्व शक्य झाले. त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. मोदी यांनी माझ्या मुलाची सुखरूप सुटका केली आहे. त्यामुळे ते त्याला वडिलांप्रमाणेच आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App