विशेष प्रतिनिधी
चंडीगड : सरकारी बस चालविण्याच्या हट्टासाठी हरयाणातील एका तरुणीने पंजाबचे परिवहन मंत्री अरमिंदर सिंह राजा यांची गाडीच अडवली. या तरुणीने आपल्याकडे जड वाहतूक परवाना असून मला सरकारी बस चालवायची असल्याचे म्हटले. शेवटी मंत्र्यांना तिला आश्वासन द्यावे लागले.The young woman stopped the transport minister’s car, want to work asbus driver
गाडी अडविल्यावर या तरुणीला अनेकांनी तिला समजवायचा प्रयत्न केला. मात्र, तिने आपला हट्ट सोडलाच नाही. त्यामुळे, मंत्री राजा यांनी पीआरटीसीच्या कार्यकारी संचालक (एमडी) यांना फोन करुन मुलीच्या ड्रायव्हींगची ट्रायल घेण्यास सांगितले.
मंत्री राजा यांनी एमडी पीआरटीसी यांना फोन करुन मुलीच्या ड्रायव्हींगची ट्रायल घेऊन शक्य असल्यास तिला नोकरी देण्याचेही सूचवले. जर एक महिला एमडी होऊ शकते, तर एक मुलगी बसही चालवू शकते. जर ही मुलगी बस चालवत असेल, तर पीआरटीसीचं नाव होईल, असेही राजा यांनी म्हटले.
नोकरीची मागणी करणारी ही मुलगी हरियाणाची रहिवाशी असून तिला वडिल नाहीत. . या मुलीने जडवाहतूक परवाना काढला आहे. तिला अनेकांनी स्पोर्टसमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तिने बस चालविण्याचाच हट्ट धरला आहे. त्यासाठी, गेल्या अनेक तासांपासून मंत्रीमहोदयांच्या गाडीची ती वाट पाहत होती.
परिवहनमंत्री राजा वडिंग यांनी एमडीला फोन करुन संबंधित मुलीला शक्य असल्यास नोकरीवर घेण्याचं सूचवलं होतं. त्यावेळी, आजकाल वातावरण खराब असल्याचं एमडींनी मंत्र्यांना सांगितलं. मात्र, मुलीने कुठल्याही परिस्थितीशी सामना करायची तयारी असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर, मंत्री राजा यांनी मुलीला एमडींचा नंबर देऊन त्यांना कॉल करण्याचे सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App