WATCH : महाबळेश्वर पर्यटनासाठी खास बससेवेला प्रारंभ सातारा एसटी डेपोत नवीन पर्यटन बस दाखल


विशेष प्रतिनिधी

सातारा : पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एक अनोखी बस तयार केली आहे. ही पर्यटन बस महाबळेश्वर पर्यटनासाठी वेगळ्या पद्धतीने बनविली आहे.

महाबळेश्वर मध्ये येणाऱ्या प्रवाशांना,पर्यटकांना विविध ठिकाणच्या पर्यटनाचा आनंद घेता यावा,यादृष्टीने या बसची बांधणी करण्यात आली आहे . महाबळेश्वर आणि प्रतापगड या भागात ही बस धावणार आहे. सातारा आगारामध्ये ही बस दाखल झाली असून या बसमध्ये ४१ प्रवाशांची आसन क्षमता आहे.या बसचे वैशिष्ट्य म्हणजे बसच्या टपाला पूर्णपणे सन रूफ असल्यामुळे पर्यटकांना बाहेरच्या निसर्गाचा आनंद लुटता येणार आहे. तसेच बसच्या सीट शेजारील असणाऱ्या खिडकीचा काचा देखील वाढवण्यात आल्यामुळे ही बस आकर्षक दिसत आहे.

मागील वर्षी या बसचा प्रयोग अयशस्वी झाल्यामुळे या बसमध्ये बदल करून पुन्हा ही बस सातारा जिल्ह्यातील पर्यटनासाठी सज्ज झाली आहे.

  • महाबळेश्वर पर्यटनासाठी खास बससेवेला प्रारंभ
  • सातारा एसटी डेपोत नवीन पर्यटन बस दाखल
  • बसमध्ये ४१ प्रवाशांची आसन क्षमता आहे
  • बसच्या टपाला पूर्णपणे सन रूफ आहे
  • पर्यटकांना बाहेरच्या निसर्गाचा आनंद लुटता येणार – -खिडकीचा काचा देखील वाढवल्या आहेत

For Mahabaleshwar Tourism Special bus service started

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण