‘’पंतप्रधान मोदींमुळे जगाने भारताची ताकद ओळखली’’ चंद्राबाबू नायडूंचे विधान, उडवणार विरोधकांची झोप!

Chandrababu Naidu

त्यांच्याकडून निघणारे कौतुकाचे शब्द निव्वळ प्रतिक्रिया नसून भविष्यातील राजकारणाचा मोठा संदेश देत होते.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ‘टीडीपी’चे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांचे आज जे विधान समोर आले आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. एवढच नाही तर चंद्राबाबू नायडूंचे हे विधान २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या विरोधकांची झोप उडवणार असल्याचंही दिसत आहे. The world recognized Indias strength because of Prime Minister Modi  Chandrababu Naidu

एनडीएचे माजी सहयोगी नायडू यांनी रिपब्लिक समिट 2023 च्या मंचावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जोरदार प्रशंसा केली. त्यांच्याकडून निघणारे कौतुकाचे शब्द निव्वळ प्रतिक्रिया नसून भविष्यातील राजकारणाचा मोठा संदेश देत होते.

नायडू रिपब्लिक समिटमध्ये व्हर्चुअली सामील झाले. ‘Technocracy for democracy’ या सत्रात तंत्रज्ञान, भारताचा यूएसपी आणि विकास यासंदर्भातील प्रश्नाबाबत त्यांनी पंतप्रधान मोदींचे व्हिजन सर्वोत्तम असल्याचे सांगितले. ते उघडपणे काही बोलले नाही. पण हसतमुखाने गोष्टी टाळण्याच्या कलेमध्ये पारंगत असलेल्या नायडू हे पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाचे समर्थन करतात आणि त्यांना पाठिंबा देतात हे दर्शवण्यापासून ते स्वतःला रोखू शकले नाहीत.

वसुधैव कुटुंबकम उक्तीच्या आधारे पंतप्रधान ज्याप्रमाणे एक राष्ट्र हे सर्वोत्कृष्ट राष्ट्र असल्याचे सांगतात त्याच धर्तीवर भारताला नंबर वन बनवण्याची इच्छा चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केली. पंतप्रधानांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना नायडू म्हणाले- ‘पंतप्रधान मोदींनी भारताला प्रोत्साहन दिले आणि जगानेही भारताची ताकद ओळखली आहे. मी पंतप्रधान मोदींच्या दृष्टिकोनाशी सहमत आहे. ते व्हिजन पूर्ण करण्यासाठी मी तेलंगणातील लोकांना प्रेरणा देईन. भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश व्हावा, असे आपले सर्वांचे स्वप्न आहे. आपण सामूहिक प्रयत्न केले तर भारत जगातील नंबर एक देश बनू शकतो.’’

The world recognized Indias strength because of Prime Minister Modi  Chandrababu Naidu

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात