ख्रिचन धर्मगुरुंनी केली पंतप्रधान मोदींची स्तुती म्हणाले…
विशेष प्रतिनिधी
एर्नाकुलम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ दौऱ्यावर आहेत, या दौऱ्यात मोदींनी एर्नाकुलममध्ये विविध चर्चच्या प्रमुख धर्मगुरूंची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या भेटीबाबत सिरो-मलबार चर्चचे मुख्य बिशप कार्डिनल मार जॉर्ज अॅलेन्चेरी यांनी सागितले की, “उत्तर भारतातील आमच्या मिशनच्या कामाबद्दल आम्हाला असलेल्या चिंता आम्ही पंतप्रधानांसमोर माडंल्या, ज्या कामांमध्ये धार्मिक कट्टरपंथीयांकडून अडथळा येत आहे”. Modi met seven top spiritual leaders of Kerala churches
याचबरोबर “दलित ख्रिश्चन, गरीब आणि उपेक्षित लोकांच्या हक्कांबद्दल देखील या बैठकीत चर्चा झाली. आम्ही शेतकरी, मच्छीमार आणि किनारी भागातील लोकांच्या समस्याही मांडल्या. पंतप्रधानांनी सर्वांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले आणि ख्रिचनांसह सर्वांच्याच सुरक्षेचे आश्वासन दिले. केरळचे लोक पंतप्रधान मोदींची स्तुती करत आहेत आणि आम्ही भविष्यातील विकासाकडे पाहत आहोत.’’ असंही कार्डिनल मार अॅलेन्चेरी यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या भेटीत सायरो-मलबार कॅथोलिक चर्चचे प्रमुख मेजर आर्चबिशप कार्डिनल मार जॉर्ज अॅलेन्चेरी, सायरो-मलंकारा कॅथोलिक चर्चचे प्रमुख कार्डिनल मार बसेलिओस क्लेमिस, सीरियन ऑर्थोडॉक्स चर्चचे प्रमुख बॅसेलिओस मार्थोमा मॅथ्यूज III आणि इतरांचा समावेश होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App