Byelections 2022 : बंगाल – महाराष्ट्रात पोटनिवडणूक विजयाने भाजप विरोधकांच्या दंडात बेटकुळ्या!!; लघु यशातून दिल्लीची कुस्ती मारण्याचा इरादा!!

पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या विविध पोटनिवडणुकीत भाजप विरोधकांना यश मिळाल्याने त्यांना “राजकीय चंद्रबळ” प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता अर्थातच केंद्रातल्या मोदी सरकारला आव्हान देण्याची ताकद निर्माण झाल्याच्या दंडातल्या बेटकुळ्या विरोधक काढू लागले आहेत. लघु यशातून दिल्लीची कुस्ती मारण्याचे मनसूबे विरोधक आखू लागले आहेत. The victory of the BJP opposition in various by-elections in West Bengal, Chhattisgarh and Maharashtra

याची सुरुवात शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी जशी केली आहे, तशीच पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. लवकरच सर्व विरोधकांची एकत्रित बैठक घेऊन भाजपला पर्याय देण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यात येतील, असे तृणमूल काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

– शत्रुघ्न सिन्हा, बाबुल सुप्रियो विजयी

बंगाल मधल्या असनसोल लोकसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आणि भाजपचे माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा यांनी 200000 लाख मतांनी विजय मिळवला आहे त्याचबरोबर भाजपमध्येच केंद्रीय मंत्री राहिले परंतु नंतर तो मूळ काँग्रेसमध्ये गेले बाबुल सुप्रियो यांनीदेखील बाली गंगा मतदारसंघातून 19000 मतांनी विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. छत्तीसगडमधील खैरागडच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराची आघाडी आहे, तरकोल्हापूर मध्ये काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव 18000 मतांनी जिंकल्या आहेत.

– मोदी विरोधक एकत्र येण्यावर भर

पोटनिवडणुकांचे निकाल अशा पद्धतीने भाजप विरोधकांच्या पथ्यावर पडल्याने त्यांना राजकीय चंद्रबळ प्राप्त झाले असल्यास त्यात नवल नाही. आणि त्यातूनच केंद्रातल्या मोदी सरकारला ठोस पर्याय देण्याच्या बाता पुढे येऊ लागल्या आहेत.

– 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आधीच 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र येण्याचे आवाहन करणारे पत्र आधीच पाठवले आहे. आता फक्त त्यानुसार एकत्र येऊन सुरुवातीची तरी बैठक घेण्याचा अवकाश आहे. त्यानंतर पुढची वाटचाल कशी करायची हे ठरणार आहे. पण पोटनिवडणुकीच्या या लघु यशाने दिल्लीची बडी कुस्ती मारण्याचा विरोधकांचा मनसूबा दिसून येत आहे…!!

– राज्यांमधले पाये मजबूत राहतील??

पण फक्त प्रश्न फक्त हा आहे, की 2 – 4 पोटनिवडणुकांच्या यशातून विरोधक दिल्लीची बडी कुस्ती मारू शकतील का…?? आणि मारण्याचा प्रयत्न केलाच तर त्यांचे आपापल्या राज्यांमधले “राजकीय पाये” शाबूत राहतील का…?? या प्रश्नाचे उत्तर मतदारांपेक्षा विरोधी नेतेच अधिक देऊ शकतील…!!

The victory of the BJP opposition in various by-elections in West Bengal, Chhattisgarh and Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात