विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवाद्याला ठार मारण्याचा कट रचल्याच्या अमेरिकेने केलेल्या आरोपादरम्यान एफबीआय प्रमुख भारत दौऱ्यावर आहेत. मंगळवारी (१२ डिसेंबर) अमेरिकेची तपास यंत्रणा असणाऱ्या एफबीआयचे प्रमुख क्रिस्टोफर रे यांनी राष्ट्रीय तपास संस्थेसह (एनआयए) इतर सुरक्षा एजन्सीच्या अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली.The US is investigating the attack on the Indian High Commission
क्रिस्टोफर यांनी म्हटले आहे की, एफबीआय या वर्षी 19 मार्च आणि 2 जुलै रोजी सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासावर झालेल्या हल्ल्यांची सखोल चौकशी करत आहे. तसेच, या प्रकरणी लवकरच काही महत्त्वाची माहिती मिळू शकेल, असा दावा त्यांनी केला.
क्रिस्टोफर यांनी दिल्लीतील उच्चस्तरीय बैठकीत एनआयएचे महासंचालक दिनकर गुप्ता यांच्याशी विविध चर्चा केली. गुप्ता यांनी मंगळवारी एनआयए मुख्यालयाला भेट देणाऱ्या रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला सांगितले की दहशतवादी आणि गँगस्टर्सच्या हालचाली अमेरिकेतही पसरत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App