विशेष प्रतिनिधी
डेहराडून – देशामध्ये कोरोना संसर्गाची तिसरी लाट सुरू झाली असे मानायला हरकत नाही. महानगरांमधील ७५ टक्के बाधितांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे, असे लसीकरणविषयक राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समूहाचे अध्यक्ष डॉ.एन.के अरोरा यांनी सांगितले.The third wave of corona outbreak has started in the country, with corona affecting 55 students in a single school
मुंबई, दिल्ली आणि कोलकत्यासारख्या तीन शहरांतील संसर्गाचा विचार केला तर तो खूप मोठा असल्याचे दिसून येते, असे ते म्हणाले.दरम्यान, उत्तराखंडमध्ये गेल्या चोवीस तासात १४१३ जणांना लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे राज्यातील एकूण बाधितांची संख्या साडेतीन लाखांवर पोचली आहे. उधमसिंहनगर जिल्ह्यातील सितारगंजच्या जीएस कॉन्व्हेंट स्कूलमध्ये ५५ मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे.
सर्वांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. शनिवारी दिवसभरात शाळेतील १५५ जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यांचा आज अहवाल आला असता ५५ जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App