विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आजच्या शपथविधी सोहळ्याला कोण येणार, यापेक्षा त्यांनी कुणाला बोलावले नाही याचीच चर्चा आता रंगली आहे.The swearing-in ceremony of Donald Trump
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना शपथविधी सोहळ्यासाठी आवर्जून निमंत्रण दिले होते परंतु नरेंद्र मोदींनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना आपले प्रतिनिधी म्हणून शपथविधी सोहळ्याला पाठवले असून शी जिनपिंग यांनी देखील आपले प्रतिनिधी म्हणून चीनचे उपराष्ट्राध्यक्ष हान झेंग पाठविले आहे. बाकी अमेरिकन महाद्वीपा मधल्या देशांचे राष्ट्राध्यक्ष शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
पण डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपमधल्या एकेकाळच्या महासत्तांच्या प्रमुखांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिलेले नाही. यामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर, जर्मन चान्स्लर ओल्फ शूल्ट्झ, युरोपियन युनियन प्रमुख उर्सूला व्हॅनडोर, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यूएल मॅक्रोन यांचा समावेश आहे. केवळ संपूर्ण युरोपच नव्हे, तर एकेकाळी जगावर महासत्ता गाजवणारे हे देश आहेत, पण त्या देशांच्या प्रमुखांना डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिलेले नाही. त्यामुळे त्या देशांचे राजदूत नियमानुसार शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App