Bulli Bai : संशयित आरोपीला मुंबई पोलिसांनी बंगळुरूमधून घेतलं ताब्यात ; संशयित इंजिनीअरिंगचा 21 वर्षाचा विद्यार्थी

विशेष प्रतिनिधी

मुंबई: मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने सोमवारी ‘बुल्ली बाई’अॅप प्रकरणी बेंगळुरू येथील एका 21 वर्षीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे.The suspect is a 21-year-old engineering student

Bulli Bai App प्रकरणातील एका संशयितला मुंबई पोलिसांनी बंगळुरूमधून ताब्यात घेतलं आहे. या संशयिताला मुंबईला आणलं जातं आहे. हा संशयित Bulli Bai App ला फॉलो करणाऱ्या पाच जणांपैकी एक आहे. त्यामुळे त्याला अटक होऊ शकते.

काय आहे Bulli Bai अ‍ॅप प्रकरण?

काही दिवसांपासून Sulli deals app चर्चेत आलं होतं. या अ‍ॅपप्रमाणेच आता bulli bai App च्या माध्यमातून मुस्लिम महिलांची बदनामी केली जात आहे. Sulli deals अ‍ॅप GitHub वर लाँच करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे Bulli bai अ‍ॅपही GitHub वर लाँच करण्यात आलं त्यावर केंद्र सरकारकडून तत्काळ कारवाई करून त्या ॲपला ब्लॉक करण्यात आलं .

एका महिला पत्रकाराने ट्विटरवरून याबद्दलची माहिती दिल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. या महिला पत्रकाराचा फोटो या अ‍ॅपवर शेअर करण्यात आला त्या फोटोवर लोकांकडून अश्लील आणि स्त्री विरोधी प्रतिक्रिया पोस्ट करण्यात आल्या .

यावर दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे.

The suspect is a 21-year-old engineering student

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात