संसदेचे विशेष अधिवेशन १८ ते २२ सप्टेंबरपर्यंत चालणार, मोदी सरकारचा निर्णय

Parliament Winter Session Opposition riots continue to disrupt Parliament for third day in A Row

हे विशेष अधिवेशन 17व्या लोकसभेचे 13वे आणि राज्यसभेचे 261वे अधिवेशन असेल.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. हे सत्र 18 ते 22 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. यामध्ये 5 बैठका होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे विशेष अधिवेशन 17व्या लोकसभेचे 13वे आणि राज्यसभेचे 261वे अधिवेशन असेल. अमृतकाळात संसदेच्या विशेष अधिवेशनात अर्थपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. The special session of Parliament will be held from September 18 to 22 Modi governments decision

संविधानाच्या कलम 85 नुसार केंद्र सरकारला संसदेचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे. संसदीय कामकाजावरील कॅबिनेट समिती यावर निर्णय घेते. हे नंतर राष्ट्रपतींद्वारे औपचारिक केले जाते, ज्याद्वारे खासदारांना (संसद सदस्य) अधिवेशनात बोलावले जाते.

यापूर्वी 20 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीत संसदेचे पावसाळी अधिवेशन झाले होते. मणिपूरमधील हिंसाचारावर अधिवेशनात बराच गदारोळ झाला. विरोधक पंतप्रधान मोदींच्या मणिपूरवरील वक्तव्यावर चर्चा करण्यावर ठाम होते, तर सरकार गृहमंत्री अमित शहा यांच्या उत्तरावर चर्चा करण्याबाबत बोलत होते. यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

यानंतर काँग्रेसने मणिपूर मुद्द्यावरून मोदी सरकारविरोधात लोकसभेत अविश्वास प्रस्ताव आणला. यावेळी राहुल गांधी यांनी मणिपूरमधील हिंसाचाराचा उल्लेख करत मोदी सरकारवर निशाणा साधला. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान मोदींनी उत्तर दिले. यासोबतच विरोधकांचा प्रस्तावही बारगळला.

The special session of Parliament will be held from September 18 to 22 Modi governments decision

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात