वृत्तसंस्था
चंडीगढ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेला कोणताही धोका नव्हता. हे मी वारंवार सांगितले आहे. वाटल्यास त्यांच्यासाठी मी महामृत्युंजय पाठ करायला तयार आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेसंबंधी मी प्रियांका गांधी यांना ब्रीफिंग केले आहे, असे पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. The security of the Prime Minister was not threatened; Punjab Chief Minister briefs Priyanka Gandhi !!
#WATCH | "There was no threat to the PM here. He was completely safe. No one went near him… I had a conversation with Priyanka Gandhi ji and I had briefed her on whatever happened here," says Punjab CM Charanjit Singh Channi pic.twitter.com/DXN4sJnjJR — ANI (@ANI) January 8, 2022
#WATCH | "There was no threat to the PM here. He was completely safe. No one went near him… I had a conversation with Priyanka Gandhi ji and I had briefed her on whatever happened here," says Punjab CM Charanjit Singh Channi pic.twitter.com/DXN4sJnjJR
— ANI (@ANI) January 8, 2022
चरणजीत सिंग चन्नी हे पंतप्रधानांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना वैतागले आहेत. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की मी किती वेळा सांगू की पंतप्रधानांच्या सुरक्षेला इथे धोका नव्हता. त्यांच्या ताफ्याच्या एक किलोमीटर परिसरामध्ये कोणीही आले नव्हते. त्यांच्या दिशेने एक दगडही फेकला गेला नाही. एक गोळीही झाडली गेली नाही. वारंवार त्यांच्या सुरक्षेविषयी अनावश्यक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. माझी या संदर्भात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याशी बातचीत झाली आहे. त्यांना पंतप्रधानांच्या सुरक्षेसंदर्भात येथे काय केले आणि काय घडले, हे सगळे मी ब्रीफ केले आहे, असे यांनी यांनी स्पष्ट केले.
परंतु प्रियांका गांधी कोण आहेत? त्यांना कोणत्या कपॅसिटीमध्ये पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी ब्रीफिंग केले? पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेची प्रियांका गांधी यांचा संबंध काय आणि कोणत्या कपॅसिटी मध्ये त्या पंजाबचा मुख्यमंत्र्यांकडून ब्रीफिंग घेतात? हे प्रश्न चरणी सिंग चन्नी यांना विचारण्यात आले नाहीत. त्यामुळे त्यांनी त्यांची उत्तरेही दिले नाहीत.
मदर तेरेसा यांच्या मिशनरीज ऑफ चॅरिटीजचा परवाना केंद्र सरकारकडून पूर्ववत
मोठी बातमी : अलिगडमध्ये समाजकंटकांकडून हनुमंताच्या मूर्तीची विटंबना, लोकांमध्ये संतापाची लाट
Complete Lockdown : कोरोनाच्या धोकादायक वेगामुळे तामिळनाडूत संपूर्ण लॉकडाऊन, वाचा इतर राज्यांमध्ये काय आहेत निर्बंध..
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App