NIA Dawood Ibrahim : एनआयए छाप्यांची व्याप्ती मोठी; दाऊदच्या 30 अड्ड्यांवर छापे; सलीम फ्रुट, कय्यूम कुरेशी, अजय गोसलिया ताब्यात!!


प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादीचे बिनखात्याचे मंत्री नवाब मलिक यांचा बुडत्याचा पाय खोलात चालला आहे. पण हा विषय आता फक्त त्यांच्यापुरता मर्यादित उरलेला नाही तर राष्ट्रीय तपास संस्था एनआयएची छापेमारी अधिक व्यापक झाली असून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्याशी संबंधित तब्बल 30 अड्ड्यांवर एनआयए अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. सलीम फ्रूट, कय्यूम कुरेशी, अजय गोसलिया यांच्यासारख्या दाऊदच्या जवळ असणाऱ्या लोकांना एनआयएने ताब्यात घेतले आहे. हे सर्वजण दाउदचा भाऊ कासकर, सलीम उर्फ जावेद चिकणा आदी लोकांच्या संपर्कात होते. या सर्वांकडून मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे अधिकाऱ्यांनी गोळा केले असून ही कारवाई आणखी पुढे जाणार आहे. The range of NIA raids is large; Raids on David’s 30 bases

यामध्ये महाराष्ट्र सरकार मधले काही मंत्री अडकणार आहेत अशी माहिती एन आय ए सूत्रांनी दिली आहे. मनी लॉन्ड्रिंग, टेरर फंडिंग याच्याशी संबंधित हा तपास आणखी अनेक दिवस चालणार आहे. अनेक बडी नावे यात अडकणार असल्याची माहिती आहे.

नवाब मलिक यांच्या ईडीच्या केसेस संपत नाहीत. त्यात आता राष्ट्रीय तपास संस्था एनआयएने तपास ताब्यात घेत नवाब मलिक यांचे निकटवर्ती माहीमच्या दर्ग्याचा विश्वास सुहेल खांडवानी आणि बाबा फालुदाचा मालक अस्लम सोरटिया यांच्यावरही छापे घालून त्यांची मालमत्ता जप्त केली आहे. हे दोघेही नवाब मलिक यांच्या बरोबर मनी लॉन्ड्रिंग टेरर फंडिंग केस मध्ये सामील असल्याचे एनआयएला आढळून आले आहे.

नवाब मलिक यांचा साथीदार आणि मुंबईतील माहिम, हाजी अली दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खंडवाणींची यांना एनआयएचा दणका बसल्याचे समोर आले आहे. सोमवारी पहाटे एनआयएच्या पथकाने मुंबईतील माहीममध्ये 4 ठिकाणी छापेमारी केली आहे. माहीम दर्ग्याचा विश्वस्त सुहेल खांडवानी यांच्या मालमत्तावरही छापेमारी करण्यात आली आहे.
सुहेल खांडवानी माहीम परिसरात राहत असून सोमवारी पहाटे त्यांच्या घराच्या परिसरात मोठा सीआरपीएफ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तसेच बाबा फालुदाचे मालक अस्लम सोरटिया यांच्या मालमत्तांवरही छापेमारी करण्यात आली आहे. मुंबईत दाऊदशी संबंधित सध्या 20 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. एनआयएने केलेल्या कारवाईमुळे मुंबईतील काही भागात एकच खळबळ निर्माण झाली आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने अर्थात एनआयए सोमवारी मोठी कारवाई करीत. एनआयएने मुंबईतील 20 ठिकाणी छापे घातले आहेत. हे 20 अड्डे दाऊदचे शार्प शूटर, तस्कर, डी-कंपनीचे रिअल इस्टेट मॅनेजर यांच्याशी संबधित असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय अनेक मनी लाँड्रिंग ऑपरेटर्सवरही छापे घालण्यात आले आहेत.

मुंबईतील या 30 अड्ड्यांवर छापेमारी

एनआयएने बोरिवली, सांताक्रूझ, वांद्रे, नागपाडा, गोरेगाव, परळ येथील 30 ठिकाणी छापे टाकले आहेत. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, एनआयएने दाऊद इब्राहिम, डी कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला होता, ज्यासंदर्भात ही चौकशी आणि छापेमारी सुरू आहे. दाऊद इब्राहिमशी संबंधित प्रकरणाचा तपास गृह मंत्रालयाने फेब्रुवारी 2022 मध्ये एनआयएकडे सोपवला होता. आता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली आहे.

The range of NIA raids is large; Raids on David’s 30 bases

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात