वृत्तसंस्था
पोर्ट : अउ-प्रिंस: कॅरेबियन देश हैतीतील प्रलयंकारी भूकंपात अनेक शहरांचं मोठे नुकसान झाले असून आतापर्यंत ७२५ नागरिकांचा मृत्यू तर 2800 जण जखमी झाले आहेत. नॅशनल सेंटर ऑफ सीस्मोलॉजीने या भूकंपाची तीव्रता ७.२ रिश्टर स्केल असल्याची माहिती दिली. The quake in Haiti has so far killed more than 700 civilians and injured 2,800 earthquake in Haiti
भूकंपामुळे जेरेमी, लेस केयस, सेंट लुइस डू सूद आणि लेस एंग्लिस या शहरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरे जमीनदोस्त झाल्यामुळे शेकडो लोकांचा संसार उघड्यावर पडला आहे.
कोरोनामुळे त्रस्त झालेल्या हैतीच्या नागरिकांची चिंता भूकंपाने आणखी वाढली आहे. भूकंपाचे केंद्र राजधानी पोर्ट औ प्रिन्सपासून १२५ किलोमीटरवर होतं. दरम्यान, चक्रीवादळ ग्रेस सोमवारी किंवा मंगळवारपर्यंत हैतीला पोचणार आहे, त्यामुळे नागरिकांन नव्या संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
भूकंपानं किमान ८६० घरं नष्ट केली तर ७००हून अधिक घरांचे नुकसान झालं आहे. रुग्णालये, शाळा, कार्यालये आणि चर्चेसही प्रभावित झाली आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी यूएसएआयडी प्रशासक समंथा पॉवर यांची हैतीला अमेरिकेच्या मदतीसाठी समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती केली. अमेरिकेसह अर्जेंटिना, चिली आणि अनेक देशांनी मदती करण्याची तयारी दाखवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App