नव्या संसद भवनाचा प्रस्ताव तर नरसिंह रावांच्या काळातलाच; गुलाम नबी आझादांनी दाबली काँग्रेसची दुखती नस!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावरून काँग्रेस सह सर्व विरोधी पक्षांनी देशात राजकीय गदारोळ माजवला असताना काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी सध्याच्या काँग्रेसची नेमकी दुखती नस दाबली आहे. नव्या संसदेचा प्रस्ताव तर पी. व्ही. नरसिंह राव यांच्या पंतप्रधान पदाच्या काळातलाच होता. तो तत्कालीन लोकसभा सभापती शिवराज पाटील यांनी मांडला होता, असे सांगून आझाद यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना डिवचले आहे.The proposal for the new parliament building was only during the time of Narasimha Rao; Ghulam Nabi Azad pressured Congress’s pain

नव्या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 28 मे 2023 रोजी सावरकर जयंतीच्या मुहूर्तावर करणार आहेत. त्याच दिवशी ते भारतीय सम्राट चोल राजवंशी यांच्या सेंगोल अर्थात राजदंडाची संसदेत प्रतिष्ठापना करणार आहेत.



मात्र नव्या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होऊ नये, तर ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावे, असे खुसपट काढून काँग्रेस सह सर्व विरोधी पक्षांनी संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार घातला आहे.

या पार्श्वभूमीवर गुलाम नबी आझाद यांनी नव्या संसद भवनाच्या निर्माणाचा इतिहास विशद केला आहे. नवीन संसद भवनाच्या निर्माणाचा प्रस्ताव तर पी. व्ही. नरसिंह राव हे पंतप्रधान पदावर असतानाच 30 – 32 वर्षांपूर्वी तत्कालीन लोकसभेचे सभापती शिवराज पाटील यांनी मांडला होता. 2026 सालापर्यंत लोकसभेची सदस्य संख्या वाढणार नाही. पण त्यानंतर मात्र सदस्य संख्या वाढवावी लागेल. त्यामुळे देशाला नव्या संसद भवनाची गरज लागेल, असे शिवराज पाटील म्हणाले होते. त्यांच्या प्रस्तावाला नरसिंह राव यांनी मान्यता देखील दिली होती. पण साधारण 1991 – 92 च्या सुमारास आलेला हा प्रस्ताव आणखी 30 वर्षानंतर संसदेचे सदस्य वाढणार असतील तर किमान 20 वर्ष तरी नवीन संसद भवन रिकामेच पडलेले राहील असे सांगून नरसिंह राव यांनी पुढे ढकलला होता.

पण दरम्यानच्या काळात अनेक सरकारे आली त्यांच्या काळात या प्रस्तावावर फार काही झाले नाही. मात्र सध्याच्या मोदी सरकारने कमी वेळेत नव्या संसद भवनाची निर्मिती केली आणि आता त्याचे उद्घाटन होत आहे.

या संदर्भात गुलाब नबी आझाद म्हणाले, कुठेही सरकार असते तरी नवीन संसद भवन बांधावेच लागले असते. कारण नवीन संसद भवनाचा प्रस्ताव तर नरसिंह राव यांच्या पंतप्रधान पदाच्या काळातला होता. त्यावेळी शिवराज पाटील हे लोकसभेचे सभापती होते. मी त्यावेळी संसदीय कामकाज मंत्री होतो. शिवराज पाटील खूप ऍक्टिव्ह होते. त्यांच्याएवढा ॲक्टिव्ह सभापती मी पाहिलेला नाही. त्यांनी कायमच संसद सदस्यांना चर्चेसाठी प्रोत्साहित केले आणि त्यांच्याच काळात कोणताही पक्षीय भेदभाव न बाळगता अनेक महापुरुषांचे तसेच कर्तृत्ववान महिलांचे पुतळे तैलचित्रे संसदेच्या आवारात लागले. नव्या संसदेचा प्रस्तावही त्यावेळी चर्चेला आला होता.

यूपीए काळात हालचाल नाही

नव्या संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर काँग्रेसने बहिष्कार घातल्याच्या पार्श्वभूमीवर गुलाम नबी आझाद यांनी नव्या संसदेच्या प्रस्तावासंदर्भात नरसिंह राव यांचे नाव घेऊन सध्याच्या सोनिया गांधी – राहुल गांधींच्या काँग्रेसची खरी दुखरी राजकीय नस दाबली आहे. म्हणजे मूळ प्रस्ताव नरसिंह राव यांच्या काळातला आणि तो प्रत्यक्षात आणला नरेंद्र मोदींनी असे त्यांनी सांगितल्याने दरम्यानच्या काळात यूपीए सरकारने त्या प्रस्तावावर कोणतीही हालचाल केली नाही हे अप्रत्यक्षपणे आझाद यांनी सूचित केले आहे. त्यामुळेच काँग्रेसची आजच्या काँग्रेसची खरी दुखती नस दाबली गेली आहे.

The proposal for the new parliament building was only during the time of Narasimha Rao; Ghulam Nabi Azad pressured Congress’s pain

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात