कोरोनावर उपाययोजनेसाठी पंतप्रधानांनी घेतली उच्चस्तरीय बैठक, पाच कलमी उपायांचा केला पुनरुच्चार


देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी चाचण्या, संपर्क शोध, उपचार, कोविड प्रतिबंधक वर्तन, लसीकरण या पाच कलमी उपायांचा पुनरूच्चार केला.The Prime Minister held a high-level meeting to discuss measures on Corona, reiterating five-point measures


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी चाचण्या, संपर्क शोध, उपचार, कोविड प्रतिबंधक वर्तन, लसीकरण या पाच कलमी उपायांचा पुनरूच्चार केला.

कोरोना काळात पाळावयाच्या नियमांचा भंग, सुरक्षात्मक उपायांचा अभाव व वर्षभराच्या साथीमुळे आलेला ताण तणाव या तीन कारणांमुळे अलीकडच्या काळात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पंतप्रधानांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत सांगण्यात आले.कॅबिनेट सचिव, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, आरोग्य सचिव हे बैठकीस उपस्थित होते. गेल्या २४ तासात देशात कोविड रुग्णांची दैनंदिन वाढ सप्टेंबर मध्यानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात झाली आहे. गेल्या २४ तासात देशात ९३२४९ इतके रुग्ण सापडले असून एकूण संख्या १.२४ कोटी झाली आहे.

१९ सप्टेंबरनंतर ही सर्वात मोठी संख्या असून सप्टेंबरमध्ये ९३३३७ इतकी रुग्णसंख्या होती. ६ ते १४ एप्रिल दरम्यान मास्कचा वापर व इतर प्रतिबंधात्मक उपायांबाबत सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करण्याचे आदेश पंतप्रधानांनी दिले आहेत.

महाराष्ट्र, पंजाब व छत्तीसगड या कोविड रुग्णांची जास्त संख्या असलेल्या राज्यात केंद्राची पथके पाठवण्यात येणार आहेत, त्यात वैद्यकीय तज्ज्ञांचा समावेश असणार आहे.

पंतप्रधान म्हणाले, सामूहिक जबाबदारीचे पालन करोनाचा सामना करण्यासाठी गरजेचे आहे. चाचण्या, संपर्क शोध, उपचार, कोविड प्रतिबंधक वर्तन, लसीकरण या पाच कलमी उपायांची गरज आहे.

आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देण्यात येणार असून व्हेंटिलेटर व ऑक्सिजन उपलब्धता, वेगाने चाचण्या व लसीकरण, खाटांची संख्या वाढवणे या उपायांचाही अवलंब करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे, की आठ राज्यातील प्रमाण एकूण संख्येच्या ८१.४२ टक्के आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, दिल्ली, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब व मध्य प्रदेशात जास्त रुग्णवाढ झाली आहे.

केंद्राने राज्यांना यापूर्वीच गर्दी टाळण्यापासून इतर प्रतिबंधात्मक उपाय करण्याच्या सूचना केल्या असून त्यात मास्कचा वापर, सामाजिक अंतर हे उपाय सुचवण्यात आले आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यातील ढिलाईमुळे रुग्णवाढ झाल्याचे सांगण्यात आले. विषाणूमध्ये झालेल्या उत्परिवर्तनामुळे रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे वैज्ञानिकांचे मत आहे.

The Prime Minister held a high-level meeting to discuss measures on Corona, reiterating five-point measures

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*