देशात आजपासून ४५ वर्षांपुढील सर्वांना मिळणार कोरोनावरील लस, संसर्ग रोखण्यासाठी रामबाण उपाय

विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : कोरोना रुग्णांची देशभरात वाढणारी संख्या रोखण्यासाठी आजपासून ४५ वर्षांच्या पुढील सर्वच नागरिकांना लस देण्यास सुरुवात होणार आहे. पुढील दोन आठवड्यांत याबाबत युद्धपातळीवर लसीकरण करावे असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.Corona vaccination drive will get boost

महाराष्ट्रासह देशभरात रूग्णसंख्या वेगाने वाढू लागल्यावर ४५ वर्षांपुढील सर्वच नागरिकांना लसीचा पहिला डोस लगेच व २८ दिवसांनी दुसरा डोस द्यावा असा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकताच केला होता. विशेषतः ज्या जिल्ह्यांत कोरोना रूग्णसंख्येचा पुन्हा उद्रेक झाला आहेत्या जिल्ह्यांत लसीकरण मोहीम वेगाने राबवावी. देशातील ज्या दहा जिल्ह्यांत रूग्णवाढीचा विस्फोट झाला आहे त्यातील मुंबई-पुणे-नागपूरसह आठ जिल्हे केवळ महाराष्ट्रातील आहेत असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

देशभरात कोरोनाची परिस्थिती “वाईटातून अधिक वाईटाकडे’ सरकू लागल्याने राज्य सरकारांनी विशेषतः सर्वाधिक फैलाव असलेल्या दिल्ली- महाराष्ट्रासह सहा राज्यांनी दक्षता घेण्याची गरज केंद्राने पुन्हा बोलून दाखविली आहे.

आता नवीन रूग्णसंख्येचा छडा लावणे व ती आटोक्याखत आणणे यासाठी जिल्हाकेंद्रीत धोरण राज्यांनी राबवावे व ग्रामीण भागाकडेही विशेष लक्ष पुरवावे असेही केंद्राने म्हटले आहे.

Corona vaccination drive will get boost

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*