वृत्तसंस्था
पुणे : भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेने तयार केलेल्या भारत विद्या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज होणार आहे. सीतारामन या आजपासून तीन दिवसांच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत. आज पहिल्या दिवशी भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेत आणि सिम्बॉयसिस महाविद्यालयात त्यांचे महत्त्वाचे कार्यक्रम होणार आहेत. भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेने तयार केलेल्या भारत विद्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. The online learning platform of Bhandarkar Institute was inaugurated today by the Union Finance Minister
भारत विद्या हा असा अनोखा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, की ज्यामध्ये प्राच्य विद्येचे मोफत आणि सशुल्क कोर्सेस उपलब्ध आहेत. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 2020 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेने हे कोर्सेस तयार केले आहेत. कला, आर्किटेक्चर, तत्त्वज्ञान भाषा आणि विज्ञान या विषयांचे हे कोर्सेस असणार आहेत.
.@nsitharaman will launch 'Bharat Vidya', an online learning platform developed by @BhandarkarI in #Pune on Wednesday. Bharat Vidya will offer courses covering various aspects of Indology pertaining to art, architecture, philosophy, language and science.https://t.co/WBlVOZEdYn — Amit Paranjape (@aparanjape) September 20, 2022
.@nsitharaman will launch 'Bharat Vidya', an online learning platform developed by @BhandarkarI in #Pune on Wednesday.
Bharat Vidya will offer courses covering various aspects of Indology pertaining to art, architecture, philosophy, language and science.https://t.co/WBlVOZEdYn
— Amit Paranjape (@aparanjape) September 20, 2022
यातील पहिले सहा कोर्सेस वेदविद्या, भारतीय दर्शनशास्त्र, संस्कृत भाषा, महाभारताची 18 पर्वे, फंडामेंटल्स ऑफ आर्किऑलॉजी कालिदास आणि भास याविषयीचे कोर्सेस भांडारकर राज्य विद्या संशोधन संस्थेने आधीच जाहीर केले आहेत. ते प्रथम या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहेत. भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेने यासाठी जगभरातील विविध विद्यापीठे आणि संशोधन संस्थांशी करार केले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more