चंदीगड : हरियाणातील कर्नालमध्ये गेल्या ७ दिवसांत परदेशातून आलेल्या २९६ लोकांपैकी एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. The Omicron virus has spread in Haryana due to foreign nationals
परदेशातून भारतात आलेल्या व्यक्ती या ओमिक्रॉन प्रभावित १२ देशांमधून आलेल्या नाहीत. तरीही त्यांचे गृह विलागीकरण करण्यात आले आहे. एक व्यक्ती दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आली होती. ४ दिवसांनंतर तिचा नमुना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवला जाईल. त्यांनतर तिला कोरोनाच्या ओमिक्रॉन आहे की नाही?, हे समजणार आहे.
कर्नालचे सीएमओ डॉ. योगेश शर्मा यांनी सांगितले की, परदेशातून येणाऱ्या लोकांची यादी दररोज विभागाकडे येत आहे. गेल्या ७ दिवसांत आलेल्या याद्यांपैकी ३६ जणांची नावे अद्याप विभागाला मिळालेली नाहीत. सापडलेल्यांपैकी एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. ही व्यक्ती ओमिक्रॉनसाठी ‘जोखीम’ यादीत ठेवलेल्या देशांमधून आलेली नाही. त्यामुळे तो ७ दिवसांपासून होम आयसोलेशनमध्ये आहे. येत्या काही दिवसांत त्यांची प्रकृती पाहिल्यानंतर जीनोम सिक्वेन्सिंगसाठी नमुना पाठवण्याचा निर्णय घेतला जाईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App