‘गीता प्रेस’चे कार्यालय कोट्यवधी लोकांसाठी मंदिरापेक्षा कमी नाही – पंतप्रधान मोदी


गीता प्रेसच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप समारंभास पंतप्रधान मोदींची प्रमुख उपस्थिती होती.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : गीता प्रेसच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. गोरखपूरमध्ये पोहोचल्यावर पंतप्रधान मोदींचे उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वागत केले. गीता प्रेसच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप समारंभात पंतप्रधान मोदी म्हणाले की, गीता प्रेस हे जगातील एकमेव मुद्रणालय आहे, जे केवळ एक संस्था नाही तर एक जिवंत श्रद्धा आहे. गीता प्रेसचे कार्यालय करोडो लोकांसाठी मंदिरापेक्षा कमी नाही. नावात आणि कार्यातही गीता आहे, जिथे गीता आहे, तिथे व्यक्तिरूपात कृष्णही आहे. The office of Gita Press is no less than a temple for crores of people  PM Modi

मोदी म्हणाले, “आमच्या सरकारने गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार दिला आहे. गीता प्रेसशी गांधीजींचा भावनिक संबंध होता. एकेकाळी गांधीजी कल्याण पत्रिकातून गीता प्रेससाठी लिहायचे. मला सांगण्यात आले की गांधीजींनी सुचवले होते की कल्याण पत्रिकामध्ये जाहिराती छापू नयेत. कल्याण पत्रिका आजही गांधीजींच्या सूचनेचे १०० टक्के पालन करत आहे.’’

याशिवाय मोदी हेही म्हणाले, “1923 मध्ये गीता प्रेसच्या रूपाने येथे जो अध्यात्मिक प्रकाश पडला, आज त्याचा प्रकाश संपूर्ण मानवतेला मार्गदर्शन करत आहे. हे आपले भाग्य आहे की आपण सर्वजण या मानवतावादी मिशनच्या सुवर्णशताब्दीचे साक्षीदार आहोत. गीता अन् प्रेस सारखी संस्था केवळ धर्म आणि कर्माशी निगडित नाही तर तिचे एक राष्ट्रीय चरित्र देखील आहे. गीता प्रेस भारताला जोडते, भारताची एकता मजबूत करते.”

The office of Gita Press is no less than a temple for crores of people  PM Modi

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात