राज ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!


राज्यातील नाट्यमय राजकीय घडोमाडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीमुळे विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सध्या मागील काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट चर्चेचा विषय ठरत आहे. शिवाय, या भेटीवरून विविध तर्कवितर्कही लावले जात आहेत. MNS President Raj Thackeray met Chief Minister Eknath Shinde

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वात महाबंडखोरी  झाल्यानंतर व अजित पवार गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर, महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. त्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावे, अशी मागणीही हळूहळू जोर धरू लागली आहे. मुंबईत तर अनेक ठिकाणी मोठाले होर्डिंग्जही झळकले आहेत. त्यात नुकतच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि मनसेचे अभिजीत पानसे यांची भेट झाली होती. शिवाय संजय राऊत यांनीही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं रक्ताचं नातं आहे, त्यांना एकत्र आणण्यासाठी इतर कुणाची आवश्यकता नाही, असं म्हटलं होतं त्यामुळे चर्चांनी अधिकच जोर धरला होता.

राष्ट्रवादीतील महाबंडखोरीवर राज ठाकरे काय म्हणाले होते? –

आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला.  उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच!’’

याशिवाय ‘’तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला. ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.‘’ असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

MNS President Raj Thackeray met Chief Minister Eknath Shinde

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात