विशेष प्रतिनिधी
मुंबई : पंजाब विधानसभा निवडणुकीत तसेच उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत असताना दक्षिणेकडील राज्यामध्ये विरोधी ऐक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या बैठका पार पडल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आज मुंबई भेटले. त्यामुळे विरोधी ऐक्याला चालना मिळाल्याचे दोन्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. के. चंद्रशेखर राव यांनी नंतर शरद पवार यांची देखील भेट घेतली.The next meeting of the Opposition Unity will be held in Hyderabad or Baramati
के. चंद्रशेखर राव यांच्या मुंबई दौऱ्यात विरोधी ऐक्याला चालना देण्यासाठी पुढच्या बैठका घेण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, ही बैठक नेमकी कुठे होणार? याविषयी ठोस उत्तर मिळण्याऐवजी दोन वेगवेगळे प्रस्ताव पुढे आले.
पत्रकार परिषद ठाकरे – केसीआरची; चर्चा ; “रोखठोक” राऊतांच्या प्रश्नोत्तरांपासून दूर पळण्याची!!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी “वर्षा”वर झालेल्या चर्चेनंतर पुढची बैठक हैदराबादमध्ये होऊ शकते. यासाठी उद्धव ठाकरे यांना मी निमंत्रण दिले आहे, असे चंद्रशेखर राव म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी त्यांना दुजोरा दिला. बाकीच्या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनाही मी निमंत्रण देईन, असे त्यांनी वर्षा बंगल्यावर स्पष्ट केले.
परंतु त्यानंतर के चंद्रशेखर राव यांनी शरद पवार यांची सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना चंद्रशेखर राव यांनी बारामतीचा उल्लेख केला. विरोधी प्रादेशिक पक्षांच्या बैठकीचा प्रस्ताव पुढे आला आहे. कदाचित बारामतीत देखील आम्ही भेटू शकतो. सर्व नेत्यांच्या सोयीने याचा निर्णय करण्यात येईल असे ते सिल्वर ओक वरील पत्रकार परिषदेत म्हणाले.
त्यामुळे एक बाब स्पष्ट झाली विरोधी ऐक्याच्या दृष्टीने पुढची बैठक घ्यायची आहे. परंतु हैदराबाद घ्यायची की बारामती या प्रश्नावर आता “राजकीय खल” होणार आहे. त्याच बरोबर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न या विरोधी ऐक्यावर विचारला जात आहे, तो म्हणजे यात काँग्रेस सहभागी होणार की नाही??, या प्रश्नाचे उत्तर सिल्वर ओकवरील पत्रकार परिषदेनंतरही मिळालेले नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App