प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पांपैकी देशातील पहिला मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प 2023 मध्ये पुर्णत्वास येणार होता. मात्र, हा प्रकल्प महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकारच्या कार्यकाळात रखडला, असा आरोप रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला आहे. बुलेट ट्रेनच्या विविध कामांना आवश्यक असलेल्या परवानग्या दिल्याने प्रकल्पाला गती आल्याचे त्यांनी सांगितले आहे. The Mumbai-Ahmedabad bullet train project stalled in the Thackeray-Pawar government
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना वेगवेगळ्या प्रकल्पांसंदर्भात माहिती दिली.
काय म्हणाले अश्विनी वैष्णव?
पत्रकार परिषदेत बोलताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प रखडला तो माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परवानग्या न दिल्यामुळे असे अश्विनी वैष्णव म्हणाले. महाराष्ट्रात बुलेट ट्रेनच्या विविध कामांना आवश्यक असलेल्या परवानग्या उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात देण्यात आल्या नाहीत. मात्र, सरकार बदलताच आताच्या शिंदे – फडणवीस सरकारने सर्व परवानग्या दिल्या असून प्रकल्पाला गती दिली जात आहे, असे वैष्णव यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App