विशेष प्रतिनिधी
पुणे – बडोद्याची राजकन्या, आयटी इंजिनियर, अभिनयही केला. मुळ्शी पॅटर्न चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुकही झाले. मात्र तेथे मन रमले नाही. तिने शेती सुरू केली. त्यातून कृषी उत्पादनांची कंपनी सुरू केली. आज ही कंपनी 18 कोटीची बनली आहे.The Mulshi pattern of the princess of Baroda, giving up acting carrear for farming
‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात चहाची टपरी चालवणारी अभिनेत्रीमालविका गायकवाड हिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते . मालविका ही मुळात आयटी इंजिनिअर. इंजिनिअर झाल्यावर पुण्यातील एका नामांकित कंपनीत तिला गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाली. काही दिवस आयटी सेक्टरमधील ग्लॅमर, पैसा तिला बरा वाटला.
पण हळूहळू तिची घुसमट सुरू झाली. समाधान कुठे मिळेना. अशात तिला शेती खुणावू लागली. मालविकाने पगाराच्या पैशातून शिरूर येथे दीड एकर शेती घेतली आणि या शेतीवर सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय तिने घेतला.
शेती करण्याच्या निर्णयामुळे तिच्या नातेवाईकांनी, मित्रांनी तिला वेड्यात काढलं. पण मालविका तिच्या निर्णयावर ठाम होती. पुढे तिच्याच विचाराचे दोन मित्र मिळाले आणि मालविका सेंद्रिय शेतीत रमली. इतकी की, त्यासाठी तिने गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीलाही लाथ मारली.तिले स्वत:ची ‘द ऑरगॅनिक कार्बन’ नावाची कंपनी देखील सुरू केली.
शेतकऱ्यांना देखील याचा थेट फायदा झाला. पुढचं प्लॅनिंग अर्थात ठरलेलं होतं. दोन मित्रांना सोबत घेऊन ती दुग्ध व्यवसायातही उतरली. विशाल चौधरी, जयवंत पाटील आणि मालविका अशा तिघांनी ‘हंपी ए 2’ नावाची कंपनी सुरू केली. दूध, तूप, दही,पनीर सोबत मिल्क ऑइल, कोकोनट ऑइल यासारखे अनेक पदार्थ त्यांच्या कंपनीत बनू लागले. आता ही कंपनी तब्बल 18 कोटींच्या घरात गेली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App