विशेष प्रतिनिधी
दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या डिमॉनिटायझेशनच्या निर्णयाला आज पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. काँग्रेस लीडर जयराम रमेश यांनी या निर्णयावर टीका करत आपल्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी केंद्र सरकारने घेतलेल्या त्या निर्णयाला जागतिक अर्थशास्त्र इतिहासातील सर्वाधिक वाईट पॉलिसी ब्लेंडर्स म्हणून अधोरेखित केला जाईल. असे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.
The most erroneous decision of demonetization to date in Indian economic history; Congress leader Jairam Ramesh
पुढे ते म्हणतात, घाई घाईमध्ये घेतलेल्या जीएसटीच्या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मोडला आहे. आणि हे प्रत्येक वर्षागणिक सिध्द होत आहे. 8/11/2016 हा भारतीय आर्थिक इतिहासातील सर्वात वाईट दिवस म्हणून लक्षात ठेवला जाईल. जीएसटीसह केलेल्या नोटाबंदीने भारतीय अर्थ व्यवस्थेचा कणा नष्ट केला. बरेच लघुउद्योग आणि अनौपचारिक क्षेत्रांमध्ये याचा प्रचंड वाईट परिणाम झाला आहे असे त्यांनी लिहिले आहे.
सोबतच जयराम रमेश यांनी माझी आर्थिक मंत्री अरविंद सुब्रमण्यम यांनी केलेला एक ग्राफ शेअर केला आहे. ‘Despite digital boom, cash is back with a vengeance’ असे या ग्राफ चे नाव आहे.
राष्ट्रपतींच्या हस्ते कंगना, अदनान सामींसह 102 मान्यवरांचा पद्मश्रीने गौरव ; राष्ट्रपती भवनात पार पडला सोहळा
डिमोनेटायजेशन बद्दल सगळ्यात पहिल्यांदा कॅशलेस इकॉनॉमी हा कन्सेप्ट मांडण्यात आला होता पण नंतर हा कन्सेप्ट बदलला गेला. देशातील काळा पैसा घालवण्यासाठी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे मात्र अर्थव्यवस्था डबघाईला आली. गोरगरिबांना धक्का बसला. अनौपचारिक क्षेत्र उद्ध्वस्त झाले. काळा पैसा तर वसूल झाला नाही पण श्रीमंत अधिक श्रीमंत झाले आहेत.
आजवरच्या सर्वात मोठ्या चुकीच्या निर्णयामुळे भारताला उतरती कळा मिळाली. आणि फक्त एका माणसाच्या इच्छेसाठी हे सर्व करण्यात आले असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी देखील नोटाबंदीच्या केंद्राच्या निर्णयावर टीका केली आहे. बेरोजगारीचा दर वाढला असताना पाच वर्षांत ना काळा पैसा वसूल झाला ना भ्रष्टाचार संपुष्टात आला. असे त्यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App