परदेशात नोकरीच्या जाळ्यात अडकलेल्या भारतीयांसाठी मोदी सरकार पुन्हा ठरले संकटमोचक


लाओसमधून १३ कामगारांना सुखरूप बाहेर काढले


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : परदेशात चांगली नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने लाओसमध्ये नेलेल्या भारतीयांसाठी मोदी सरकार पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अथक प्रयत्नांमुळे लाओसमध्ये अडकलेल्या १३ भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यात आले आहे. या कामगारांना आमिष दाखवून लाओसला बेकायदेशीर कामासाठी नेण्यात आले होते. पुढे त्यांना कठोर मजुरी, छळ, पगार न मिळणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागले.The Modi government has once again become a problem solver for Indians stuck in the net of jobs abroad



ही माहिती परराष्ट्र मंत्रालयापर्यंत पोहोचताच सरकार सक्रिय झाले. मोदी सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे लाओसमध्ये अडकलेल्या या १३ भारतीयांची सुटका करण्यात आली असून त्यांना मायदेशी पाठवण्यात येत आहे. लाओसमधील भारतीय दूतावासाने रविवारी ही माहिती दिली. मागील महिन्यात देखील याच लाओसमध्ये अडकलेल्या अन्य १७ भारतीय कामगारांची सुटका करून त्यांना भारतात परत आणण्यात आले होते. लाओसमधील भारतीय दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले

ज्या भारतीयांना परत आणण्यात आले आहे त्यांना लाओसच्या अटापेउ प्रांतातील लाकूड कारखान्यात काम करायला लावले जात होते. यामध्ये ओडिशातील सात कामगार आणि बोकीओ प्रांतातील गोल्डन ट्रँगल एसईझेडमध्ये काम करणाऱ्या सहा भारतीय तरुणांचा समावेश आहे. या सर्वांना आता सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. याआधीही परदेशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि कामगारांना विशेष मोहिमेअंतर्गत बाहेर काढण्यासाठी सरकार मदत करत आहे.

The Modi government has once again become a problem solver for Indians stuck in the net of jobs abroad

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात