प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येत्या 15 वर्षात अखंड भारताचे स्वप्न साकार होईल, असे वक्तव्य केले आहे. त्यातून राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थ एनडीए मधील भाजपचा मित्रपक्ष संयुक्त जनता दलाचे नेते के. सी. त्यागी यांनी यासंदर्भात एक महत्त्वाची मागणी केली आहे.The model and strategy of a united India. Mohan Bhagwat should tell
डॉ. मोहन भागवत यांनी अखंड भारताची संकल्पना मांडली असली तरी त्याचे प्रारूप आणि रणनीती हे देखील त्यांनी स्पष्ट करावी. अखंड भारताच्या संकल्पनेत अफगाणिस्तान, नेपाळ, श्रीलंका यांच्यासारखे सध्या स्वतंत्र असलेले देश देखील बसतात का? हे स्पष्ट करावे. अखंड भारत बनवण्यासाठी कोणता मार्ग ते स्वीकारतील?, याची रणनीती सांगावी, अशी मागणी त्यागी यांनी केली आहे.
– रशिया – युक्रेन संघर्षाची आठवण
त्याच वेळी रशियाने युक्रेन यांचे उदाहरण देऊन त्यागी यांनी डॉ. मोहन भागवत यांच्याशी असलेल्या मतभेदांचा देखील खुलासा केला आहे. एकेकाळी यूक्रेन हा रशियाचा भाग होता. पण फक्त नाटो समुदायाने युक्रेन रशिया पासून वेगळे करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तेथे जो युद्ध प्रसंग उद्भवला आहे. तसा युद्धप्रसंग भारताला परवडेल का?, याचा विचार केला पाहिजे, असा इशारा त्यागी यांनी दिला आहे.
– महात्मा गांधींची न उगारलेली लाठी
संपूर्ण जग फक्त शक्तीला ओळखते. त्यामुळे आम्ही अहिंसेच्या गोष्टी करू. परंतु हातात लाठी घेऊन करू, असे मोहन भागवत म्हणाले आहेत. त्यावर बोलताना त्यागी यांनी महात्मा गांधी यांची लाठी त्यांच्या वृद्धत्वाचा सहारा होती. ती लाठी कधी कोणाला मारायला त्यांनी उगारली नाही, याची आठवण त्यागी यांनी करून दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App