देशात शिक्षण, आरोग्य क्षेत्रात म्हणाव्या तशा सुविधा नाहीत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात ही परिस्थीती बिकट आहे. कोरोना काळात ही अवस्था प्रकर्षाने जाणवली. त्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत या सुविधा पाठवणे येत्या काळात गरजेचे आहे असे मत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे – देशात शिक्षण, आरोग्य क्षेत्रात म्हणाव्या तशा सुविधा नाहीत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात ही परिस्थीती बिकट आहे. कोरोना काळात ही अवस्था प्रकर्षाने जाणवली. त्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत या सुविधा पाठवणे येत्या काळात गरजेचे आहे. या सोबतच समाजातील सामाजिक, आर्थिक अस्पृश्यता नष्ट होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी केले. Central minister Nitin Gadkari says the education and health sector condition worst in country
पुण्यातील डोणजे परिसरात एका हॉस्पिटलच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, अभिनेते नाना पाटेकर, आमदार भिमराव अण्णा तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते. गडकरी म्हणाले, ग्रामीण भागात शिक्षक आहेत तर शाळेला इमारती नाहीत. इमारत आहे तर विद्यार्थी नाहीत. जर दोन्ही असेल तर शिक्षक नाही. आज ही परिस्थीती बदलत आहे. मात्र आरोग्य विषयक समस्या आजही आहेत. कोरोना काळात त्या प्रकर्षाने जाणवल्या. जेव्हा कोरोना काळात आॅक्सीजनची कमतरता होती. तेव्हा गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात आम्ही व्हेन्टीलेर आॅक्सीजन कॉन्सट्रेटर पाठवले.
पण तेथील डॉक्टरांना ते कसे वापरावे हे माहित नव्हते. त्यांना ते कसे वापरावे याचे व्हिडीओ पाठवावे लागले, ही दुर्देवाची बाब आहे. ग्रामीण भागात उभारलेला हा दवाखाना येथील नागरिकांसाठी फायदद्याचा ठरणार आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेकर यांची जयंती आहे. या दिवशी हा दवाखाना सुरु होतोय ही चांगली बाब आहे. आज समाजातील जे ख-या अर्थाने शोषित आहे, वंचिंत आहेत, दलित आहे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या आर्थीक गरजा पूर्ण झाल्या की त्यातून जे गरजु आहे त्यांना मदत करणे गरजेचे आहे.
मी जातीपात मानत नाही. मानवतावाद आणि सामाजिक दायित्व ही भावना आज सर्वात मोठी आहे. गरीब लोकांची सेवा या दवाखान्याच्या माध्यमातून आपण करणार असल्याने आनंद झाला आहे. आज समाजात जे ख-या अर्थाने शोषित आहे, पिडीत आहेत, दलीत आहेत. या सोबत सामाजिक आर्थीक शैक्षणिक दृष्टा मागासलेले आहेत. ज्यांच्याजवळ आजही वैद्यकीय सुविधा पोहचू शकत नाही अशांना चांगल्या सुविधा देणे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
महामानवाच्या जयंतीच्या दिवशी समाजातील जो जातीवाद, अस्पृश्यता आहे ती समुळ नष्ट व्हावी, सामाजिक आणि आर्थीक समानता ख-या अर्थाने प्रस्थापित झाली पाहिजे. आणि शोषित पिडीत माणसाला सन्मानाने जगता आले पाहिजे. हे तेव्हाच शक्य आहे. जेव्हा शिक्षण विषयक स्वास्थ विषयक आर्थीक विषयक सगळ्या सुविधा त्यांना मिळतील तेव्हाच ते ख-या अर्थाने स्वतंत्र होणार आहे. हे काम दीर्घकालीन असून त्यासाठी खूप काम करावे लागणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App