पत्रकारांच्या सुरक्षेसाठी गृहमंत्रालय ‘SOP’ तयार करणार ; माफिया अतिक आणि अशरफ अहमद यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय!

बनावट पत्रकार बनून माध्यम प्रतिनिधींच्या गर्दीत आलेल्या तीन जणांनी अतिक अहमद व अशरफची हत्या केली 

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय गृह मंत्रालय SOP (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) तयार करणार आहे. काल माफिया डॉन अतिकवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. कारण, बनावट पत्रकार बनून माध्यम प्रतिनिधींच्या गर्दीत आलेल्या तीन जणांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांची गोळ्या झाडून हत्या केली. The Ministry of Home Affairs will prepare SOPs for the safety and security of journalists

माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना शनिवारी रात्री उशीरा पोलीस कोठडीत आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात नेत असताना वैद्यकीय महाविद्यालयाजवळ प्रसारमाध्यम प्रतिनिधी म्हणून आलेल्या दुचाकीस्वार हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.

पोलिसांच्या गराड्यात असतनाही व समस्त माध्यमांच्या उपस्थितीत गोळ्या झाडून अतिकची हत्या करण्यात आल्यानंतर पोलिसांसह प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्येही खळबळ उडाली आहे. गोळीबारात एक हवालदारही जखमी झाल्याचे वृत्त आहे.

उमेश पाल खून प्रकरणात माफिया अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ चार दिवस पोलिस कोठडीत होते. शनिवारी तिसऱ्या दिवशी धुमणगंज पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये बंद असलेल्या अतिक आणि अश्रफ यांची एटीएसकडून शस्त्र तस्करीसंदर्भात चौकशी करण्यात आली. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दोघांना नियमित वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले जात होते. त्यामुळे दुचाकीवरून आलेले दोन हल्लेखोर मीडियाचे लोक म्हणून आले आणि त्यांनी गोळीबार करत दोघांनाही ठार केले.

The Ministry of Home Affairs will prepare SOPs for the safety and security of journalists

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात