केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 4 टक्के महागाई भत्ता मिळण्याची उलटी गिनती सुरू झाली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीनंतर महागाई भत्त्याबाबतची फाईल आता केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पोहोचली आहे. मंत्रिमंडळ बैठकीच्या अजेंड्यामध्ये समाविष्ट असलेल्या फाईलला आता केव्हाही मंजुरी मिळू शकते, असे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. बुधवारी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 4 टक्के महागाई भत्ता मिळण्याची उलटी गिनती सुरू झाली आहे. The Ministry of Finance has approved the dearness allowance of central employees
सूत्रांचे म्हणणे आहे की, दिवाळीपूर्वी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्यांच्या ऑक्टोबरच्या पगारात डीए/डीआर दर वाढीचा परिणाम दिसून येईल. गेल्या वर्षी, केंद्रीय मंत्रिमंडळाने 28 सप्टेंबर रोजी डीएच्या दरात चार टक्के वाढ जाहीर केली होती. गेल्या वर्षी 24 ऑक्टोबर रोजी दिवाळी असल्याने सरकारने सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात DA/DR जाहीर केला. यावेळी 24 ऑक्टोबरला दसरा आणि 12 नोव्हेंबरला दिवाळी आहे, अशा स्थितीत मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव केव्हाही मंजूर होऊ शकतो.
1 जुलैपासून सुमारे एक कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 4 टक्के डीए वाढीची भेट मिळणार आहे. अलीकडेच हा मुद्दा नॅशनल कॉन्सिल (जेसीएम) कर्मचाऱ्यांच्या बाजूच्या बैठकीतही मांडण्यात आला होता. ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनचे (AIDEF) सरचिटणीस सी. श्रीकुमार यांच्या म्हणण्यानुसार, यावेळी जवानांचा डीए 46 टक्के असेल, केंद्र सरकार डीएमध्ये चार टक्के वाढ करणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App