जाणून घ्या अमित शाह यांनी काय म्हटलं आहे?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत, युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (ULFA) च्या प्रो-टॉक गटाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत केंद्र आणि आसाम सरकारसोबत त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.The militant organization ULFA in the North East laid arms before the government
यादरम्यान आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, आसामसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आसामची शांतता प्रक्रिया पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे….”
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, आसाम आणि संपूर्ण ईशान्येला बराच काळ हिंसाचार सहन करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ईशान्य भारत अतिरेकी, हिंसाचार आणि संघर्षापासून मुक्त करण्यासाठी गृह मंत्रालय कार्यरत आहे.
याचबरोबर भारत सरकार, आसाम सरकार आणि ULFA यांच्यात करार झाला आहे. यासह, आसाममधील सर्व सशस्त्र गटांना येथेच संपवण्यात आम्हाला यश आले आहे. आसाम आणि ईशान्येकडील राज्यांच्या शांततेसाठी हे खूप महत्त्वाचे आहे…”राज्यांच्या शांततेसाठी हे खूप महत्त्वाचे आहे.” असंही शाह म्हणाले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App