विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुस्लिम महिलांचे फोटो अॅपवर टाकून त्यांची बोली लावणाºया बुली बाई अॅप प्रकरणातील मुख्य आरोपी एक अठरा वर्षाची तरुणी असल्याचे समोर आले आहे. उत्तराखंडमधून या तरुणीला मुंबई पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.The main accused in the Bully Bai case was an 18-year-old girl, who was harassing women
गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर आणि राजकीय वतुर्ळात देखील बुली बाई प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. बुली बाई अॅपवर मुस्लीम महिलांचे फोटो अपलोड करून आक्षेपार्ह भाषेत मजकूर टाकल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघड झाला होता. एका मुस्लीम महिला पत्रकाराचे फोटो देखील अशाच प्रकारे अपलोड झाल्यानंतर हा प्रकार उजेडात आला.
यानंतर मुंबई पोलिसांनी दाखल झालेल्या तक्रारीच्या आधारावर तपास केल्यानंतर बंगळुरूमधून एका २१ वर्षीय तरुणाला अटक करण्या आली होती. मात्र, आता या प्रकरणातील मुख्य आरोपीलाही अटक झाली असून ती एक महिला असल्याचं समोर आलं आहे.
या प्रकरणात आधी मुंबई पोलिसांनी बंगळुरूमधून एका २१ वर्षीय तरुणाला अटक केली होती. या तरुणाने या अॅपवर बुली बाईसारख्या आक्षेपार्ह मजकुरासाठी खोटी अकाउंट्स सुरू केली होती. यातल्या काही अकाउंट्सला शीख नावं देण्यात आल्याचं देखील समोर आलं आहे.
या तरुणाची गेल्या दोन दिवसांपासून पोलीस चौकशी करत आहेत. त्यानंतर आज उत्तराखंडमधून या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.
ही महिला बुली बाई अॅपशी संबंधित तीन खाती हाताळत होती. बेंगलुरूमधून ताब्यात घेतलेल्या विशाल कुमार नामक तरुणाने खालसा सुप्रिमेसिस्ट नावाने एक अकाउंट ३१ डिसेंबर रोजी सुरू केलं होतं. यासोबत या अकाऊंटचे इतर बनावट खालसा सदस्य देखील दाखवण्यात आले होते, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
मुस्लीम महिलांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून त्यांचे फोटो या अॅपवर अपलोड करून त्यांचा लिलाव करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यावरून मोठा वादंग निर्माण झाला. एका महिलेने याबाबत मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर त्याचा तपास सुरू झाला.
पोलिसांनी रविवारी या प्रकरणात बंगळुरूमधून एका २१ वर्षीय तरुणाला अटक केल्यानंतर आज उत्तराखंडमधून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. ही महिलाच मुख्य आरोपी असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
असाच काहीसा प्रकार याआधीही ६ महिन्यांपूर्वी चर्चेत आला होता. तेव्हा सुल्ली डील या नावाने मुस्लीम महिलांची अशा प्रकारे बदनामी करण्याचा प्रकार घडला होता. तेव्हा याबाबत तक्रार देखील दाखल करण्यात आली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App