बारामतीच्या चाणक्यांची उभी केलेली महाविकास आघाडी कोसळली; अमित मालवीय यांची खोचक टीका


प्रतिनिधी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय टीकेचा रोख सगळा त्यांच्याकडे वळला असताना भाजपचे सोशल मीडिया नेटवर्कचे प्रमुख अमित मालवीय यांनी मात्र वेगळ्या खोचक शब्दांमध्ये शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.The Mahavikas Aghadi erected by the Chanakyas of Baramati collapsed; Criticism of Amit Malviya

ज्या बारामतीच्या चाणक्यांना महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून नावाजले जाते, त्यांची महाविकास आघाडी आता कोसळली आहे. आधीच त्यांच्या पुतण्याने बंड करून ते नाकाकडून निघून गेले होते. तेव्हाच या चाणक्यांची नेते पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळाली होती. त्यांचे दोन महत्त्वाचे सहकारी भ्रष्टाचार आणि देशद्रोहाच्या आरोपात जेलमध्ये आहेत.



मूळात बारामतीच्या चाणक्यांना शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यावे लागले होते. केवळ भाजपला रोखण्यासाठी या चाणक्यांनी महाविकास आघाडी उभी केली होती. पण आता त्यांनी कुटील बुद्धीने उभी केलेली महाविकास आघाडी देखील कोसळली आहे, अशा खोचक शब्दात अमित मालवीय यांनी ट्विट करून शरद पवार यांच्यावर शरसंधान साधले आहे.

The Mahavikas Aghadi erected by the Chanakyas of Baramati collapsed; Criticism of Amit Malviya

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात