प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत खासदारांना तिकीट कपण्यावरून दिलेला इशारा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर गाजला पण त्याच वेळी पंतप्रधान मोदींनी सध्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजत असलेल्या “द काश्मीर फाईल्स” या चित्रपटाविषयी फार महत्त्वाचे भाष्य केले.The Kashmir Files Modi: Contractors of freedom of expression are blocking the movie “The Kashmir Files” !!; Modi’s beating
दडपलेले सत्य बाहेर आणले
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, सध्या देशात आणि परदेशात तर “द काश्मीर फाईल्स” या चित्रपटाची फार मोठी चर्चा सुरू आहे. एका दिग्दर्शकाने फार मोठे धाडस करून गेली कित्येक वर्षे दाबलेले सत्य बाहेर आणले आहे. पण या देशातली एक पुरोगामी जमात – एक इकोसिस्टीम अशा पद्धतीने आता कार्यरत झाली आहे, की इतिहास सिनेमाला यश मिळते आहे ना मग तो दाबून टाका. लोकांनी तो सिनेमा पाहू नये यासाठी संपूर्ण “पुरोगामी इकोसिस्टीम” कामाला लागली आहे.
आत्तापर्यंत जे सत्य दाबण्यात आले ते इथून पुढेही दबलेलेच राहावे यासाठी ही “पुरोगामी इकोसिस्टीम” काम करत आहे. आतापर्यंत देशात जे अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाने झेंडे घेऊन फिरत होते, तेच इकोसिस्टीमचा मोठा हिस्सा आहेत, असा तिखट प्रहार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
फाळणीवर सिनेमा बनवा
… आणि फक्त “द काश्मीर फाईल्स”च कशाला… प्रश्न एका सिनेमाचा नाही, त्या पलिकडचा आहे. इथून पुढच्या काळात देशाच्या फाळणीला विषयी, फाळणी मध्ये झालेल्या अत्याचारांविषयी सत्यशोधन करणारे सिनेमे बनले पाहिजेत. इतकेच काय तर गंगा मोहिमेवर देखील सिनेमे बनले पाहिजेत. सत्य नेहमी आमच्याच बाजूने आहे असे काही ठेकेदार मानतात. वास्तविक पाहता सत्याला अनेक बाजू असतात. त्या सर्व बाजूंनी सत्य दाखवण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. त्या पद्धतीने नवीन नवीन सिनेमे तयार झाले पाहिजेत, असे मोदी म्हणाले.
बॉलिवूडमध्ये दोन तट
” द काश्मीर फाईल्स” या सिनेमामुळे बॉलिवूडमध्ये आधीच खळबळ माजली आहे. बॉलिवूडमध्ये या विषयावरून दोन तट पडले आहेत. अशा स्थितीत दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “द काश्मीर फाईल्स” या चित्रपटाविषयी भाष्य करणे याला राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या फार मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App