वृत्तसंस्था
जम्मू : काश्मीरमधील 1990 च्या दशकातील हिंदूंच्या नरसंहाराचे वास्तव दाखवणारा सिनेमा “द काश्मीर फाईल्स” या मुद्द्यावरून देशापरदेशात जोरदार वादंग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या जी 23 गटातील नेते गुलाब नबी आझाद यांनी एक परखड मत व्यक्त केले आहे. काँग्रेससह सगळेच राजकीय पक्ष 24×7 जनतेत फूट पाडण्याच्या कामाला लागलेले असतात. धर्म, जात, पंथ, भाषा या मुद्द्यांवर राजकीय पक्ष जनतेमध्ये फूट पाडतात. परंतु सभ्य सुसंस्कृत समाजाने एकजूट यावर भर दिला पाहिजे, असे गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.The Kashmir Files: All political parties, including the Congress, divide the people 24 × 7; Attack of Ghulam Nabi Azad !!
नरसंहारामागे पाकिस्तान
1990च्या दशकात काश्मीर मध्ये जो नरसंहार झाला त्यामागे पाकिस्तान आणि त्या देशाने पोचलेल्या दहशतवादी संघटना होत्या. काश्मिरी हिंदू पंडित, मुस्लिम, डोगरा या सगळ्यांनाच हिंसाचाराची झळ पोहोचली होती. न्याय सगळ्यांनाच मिळाला पाहिजे, असे मत गुलाब नबी आझाद यांनी व्यक्त केले.
सिव्हिल सोसायटीने एकजूट दाखवावी
महात्मा गांधी हे सर्वात मोठे हिंदू आणि धर्मनिरपेक्ष नेते होते असे सांगून गुलाम नबी आझाद म्हणाले राजकीय पक्षांवर विश्वास ठेवण्यात फारसा अर्थ उरलेला नाही. कारण 24×7 जनतेमध्ये फूट पाडणे हेच त्यांचे काम उरले आहे. यामध्ये माझा पक्ष काँग्रेस देखील सामील आहे. त्याला या पापातून वगळण्याचे कारण नाही. परंतु जनतेचे प्रश्न खऱ्या अर्थाने सोडवायचे असतील आणि देशात हिंसाचार मुक्त वातावरण निर्मिती करायची असेल तर सुसंस्कृत आणि सभ्य समाजाने पुढाकार घेतला पाहिजे, यावर गुलाब नबी आझाद यांनी भर दिला आहे.
दडपलेला इतिहास
“द कश्मीर फाईल्स” या सिनेमात 1990 च्या दशकातील हिंदूंचा नरसंहार दाखविण्यात आला आहे. आत्तापर्यंत हे वास्तव सुमारे साडेतीन दशके दडपण्यात आले होते. हा काल-परवा घडलेला इतिहास डाव्या इतिहासकारांनी जनतेसमोर येऊ दिला नव्हता. “द काश्मीर फाईल्स” सिनेमाच्या निमित्ताने हा भयानक इतिहास जनतेसमोर आला आहे आणि देशापरदेशात या निमित्ताने मोठे मंथन सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर गुलामनबी आझाद यांनी व्यक्त केलेले मत परखड मानले जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App