Savarkar Smarak Mumbai : कोरोना काळात बंद ठेवलेला “स्वातंत्र्यवीर : लाईट अँड साऊंड शो” पुन्हा सुरू!!


प्रतिनिधी

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक निर्मित स्वातंत्र्यवीर हा भव्य, नाविन्यपूर्ण उपक्रम लाईट अँड साऊंड शो कोविड महामारीमुळे दीर्घकाळ बंद होता आणि आता तो पुन्हा सुरू होत आहे. ‘स्वातंत्र्यवीर’ हा शो स्मारकासाठी नव्हे, तर साऱ्या देशासाठीच एक मानबिंदू आहे.Savarkar Smarak Mumbai: “Swatantryaveer: Light and Sound Show” closed during Corona period resumes

वॉलमॅपिंग तंत्रज्ञानावर आधारित हा भारतातील पहिला आणि सर्वात मोठा थ्री डी शो आहे. विशेष म्हणजे, कायमस्वरूपी आणि व्यक्तिचित्रणात्मक अशा भव्य ‘लाईट अँड साऊंड शो’मुळे केवळ मुंबईचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची मान सन्मानाने उंचावणार आहे.कसा असेल “लाईट अँड साऊंड शो”?

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या दर्शनी भागात 66 फूट x 94 फूट भिंतीवर हा कार्यक्रम दाखविला जाईल. यासाठीचा प्रोजेक्टर 27 फूट उंचीवरील एका मनोऱ्यात ठेवण्यात आला आहे. प्रेक्षकांना बसण्यासाठी तात्पुरती गॅलरी उभारण्यात आली असून एका वेळेला 150 प्रेक्षक हा कार्यक्रम बघू शकतील.

स्वातंत्र्यवीर सावरकर प्रखर राष्ट्राभिमानी, क्रांतीकारक, संवेदनशील कवी, लेखक होतेच पण द्रष्टेही होते आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे पुरस्कर्तेही होते. त्यामुळे त्यांच्यावरील कलाकृती साकारताना कला आणि तंत्रज्ञानाचा संगम असणे अत्यावश्यक होते.

बरोबर 8.00 वाजता हा शो सुरू होतो. तत्पूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भव्य पुतळा, त्याच्या दोन्ही बाजूला असलेली १८५७ च्या स्वातंत्र्य समरापासून स्वातंत्र्यापर्यंतच्या काल खंडावरील भित्तिशिल्पे पाहता येतील. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये सर्वच क्रांतिकारकांना ज्या यमयातना भोगाव्या लागल्या त्याचे स्मरण करून देणारा कोलू, विविध प्रकारच्या बेड्याही पाहता येतील.

सावरकरांचे क्रांतिकार्य तरुण पिढीपर्यंत पोहचविणारी नेत्रदीपक कलाकृती

‘स्वातंत्र्यवीर’ या लाईट अँड साऊंडची शो ची संकल्पना आणि दिग्दर्शन, ‘लोकमान्य- एक युगपुरुष’ या अप्रतिम चित्रपटाचे तरुण दिग्दर्शक ओम राऊत यांची आहे. तर स्मारकाच्या या अतिशय आगळ्यावेगळ्या,

महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि मंजिरी मराठे यांनी पेलली आहे. हा भव्य लाईट अँड साऊंड शो म्हणजे सावरकरांचे क्रांतिकार्य तरुण पिढीपर्यंत पोहोचविणारी एक आधुनिक आणि नेत्रदीपक कलाकृती आहे.

सावरकरांच्या आभासी प्रतिकृतीला वास्तविकतेची झालर येण्यासाठी कमालीचे व्हिज्युअल आणि साऊंड इफेक्ट्स दिले गेल्याने प्रेक्षकांसाठी हा शो नेत्रदीपक पर्वणी ठरेल यात शंकाच नाही. या शोच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील काही घटना आणि वीर सावरकरांचा जीवनपट उलगडण्यास मदत होईल.

कधी, कुठे पाहता येणार 3D मॅपिंग ध्वनी प्रकाश शो?

स्थळ : स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर

वेळ : रात्री 8.00 (दर शनिवार आणि रविवार)

कालावधी : 40 मिनिटे

प्रवेश : विनामूल्य

Savarkar Smarak Mumbai: “Swatantryaveer: Light and Sound Show” closed during Corona period resumes

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण