भारतीय तटरक्षक दलाने समुद्रात अडकलेल्या ‘सिंधू साधना’ संशोधन जहाजातून आठ शास्त्रज्ञांसह ३६ जणांची केली सुटका!


अत्याधुनिक संशोधन जहाज मौल्यवान वैज्ञानिक उपकरणे आणि संशोधन डेटा घेऊन जात होते.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय तटरक्षक दलाने (ICG) गोवा आणि कारवार दरम्यान अडकलेल्या भारत सरकारच्या संशोधन जहाजाची सुटका केली आहे, जे तांत्रिक समस्यांमुळे समुद्रातील लाटांशी झुंज देत होते. या जहाजावर 28 सदस्यांच्या क्रू व्यतिरिक्त 8 शास्त्रज्ञ होते.  सर्व 36 जणांची सुटका करून गोव्यात सुखरूप आणण्यात आले आहे. हे अत्याधुनिक संशोधन जहाज मौल्यवान वैज्ञानिक उपकरणे आणि संशोधन डेटा घेऊन जात होते. The Indian Coast Guard rescued 36 people including eight scientists from the research ship Sindhu Sadhana stuck in the sea

तटरक्षक दलाचे डीआयजी केएल अरुण यांनी सांगितले की, भारतीय तटरक्षक दलाने गुरुवारी गोवा आणि कारवार दरम्यान अडकलेल्या एका संशोधन जहाजाची सुटका केली. जहाजामध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली होती, त्यामुळे जहाजावरील एकूण 36 लोक समुद्रात अडकले होते. जहाजातून काल दुपारी 3 च्या सुमारास समस्या उद्भवल्याचे जाहीर केले होते.

या जहाजात 28 क्रू मेंबर आणि 8 शास्त्रज्ञ होते आणि त्यांना वाचवल्यानंतर गोव्यात परत आणण्यात आले आहे. परिस्थिती गंभीर होती, कारण अत्याधुनिक संशोधन जहाज मौल्यवान वैज्ञानिक उपकरणे आणि संशोधन डेटा घेऊन जात होते. अखेर खूप प्रयत्नानंतर ते वाचवण्यात आले.

तटरक्षक दलाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की ‘सिंधू साधना’ हे संशोधन जहाज इंजिनमध्ये बिघाड झाल्याने किनार्‍याच्या दिशेने 3 नॉटिकल मैल वेगाने वाहत होते. 26 जुलै रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास कोस्ट गार्ड मुख्यालय, गोवा यांना संकटाचा फोन आला तेव्हा जहाज सुमारे 20 नॉटिकल मैल दूर होते. संकटाचा कॉल मिळाल्यावर, भारतीय तटरक्षक दल ताबडतोब कृतीत उतरले आणि उच्च प्राधान्याने बचाव कार्य सक्रिय केले. भारत सरकारच्या संशोधन जहाजाच्या सुटकेसाठी पहिले जहाज संध्याकाळी ५ वाजता आणि दुसरे जहाज रात्री पोहोचले.

The Indian Coast Guard rescued 36 people including eight scientists from the research ship Sindhu Sadhana stuck in the sea

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*