देशात 2020 मध्ये धार्मिक आणि जातीय दंगलींच्या घटनांत दुपटीने वाढ, दिल्ली दंगलीमुळे वाढली आकडेवारी

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्लीः देशातील धार्मिक आणि जातीय दंगलींच्या घटनांत २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. कोरोना महामारीमुळे लागू निर्बंधांमुळे नागरिकांच्या हालचालीवर प्रतिबंध सीमित असतानाही धार्मिक आणि जातीय दंगलींच्या घटनांत वाढ झाल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) आकडेवारीत दिसून आले आहे.The incidence of religious and ethnic riots in the country doubled in 2020, with the figures rising due to the Delhi riots

२०२० मध्ये धार्मिक आणि जातीय दंगलींचे ८५७ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात २०१९ मध्ये ४३८ धार्मिक आणि जातीय दंगली नोंदवण्यात आल्या होत्या. २०१८ मध्ये हीच संख्या ५१२ होती.
कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत २५ मार्च २०२० ते ३१ मे २०२० पर्यंत देशात पूर्णतः लॉकडाऊन लागू करण्यात आला होता.



या काळात सार्वजनिक ठिकाणी लोकांची ये-जा मर्यादित होती, असेही एनसीआरबीने म्हटले आहे.देशात मागील वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये संशोधित नागरिकता कायद्याच्या (सीएए) मुद्यावर अनेक ठिकाणी आंदोलने झाली. उत्तर-पूर्व दिल्लीत दंगली झाल्या आणि मार्चपासून कोरोना महामारीचा प्रकोप सुरू झाला.

उत्तर-पूर्व दिल्लीत सीएएचे समर्थक आणि विरोधकांत हिंसाचार उफाळल्यानंतर २४ फेब्रुवारी २०२० रोजी जातीय दंगली सुरू झाल्या होत्या. त्यात ५३ लोकांचा मृत्यू झाला तर ७०० हून अधिक लोक जखमी झाले होते.२०२० मध्ये भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये नोंदवलेल्या सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचवल्याच्या एकूण गुन्ह्यात दंगली घडवल्याचे एकूण ५१ हजार ६०६ गुन्हे नोंदवले गेले. अशा प्रकारच्या एकूण गुन्ह्यात दंगलींच्या गुन्ह्यांची संख्या ७२.६ टक्के होती.

महामारीने प्रभावीत ठरलेल्या २०२० या वर्षात गुन्ह्यांच्या संख्येत २८ टक्के वाढ झाली आहे. या अहवालानुसार कोरोना निर्बंधांचे उल्लंघन करणे हे प्रमुख गुन्ह्याच्या श्रेणीत नोंदले गेले. देशभरात अशा प्रकारचे एकूण ६६ लाख १ हजार २८५ दखलपात्र गुन्हे नोंदले गेले. त्यात भादंविअंतर्गत ४२ लाख ५४ हजार ३५६ गुन्हे आणि विशेष अथवा स्थानिक कायद्यान्वये २३ लाख ४६ हजार ९२९ गुन्हे नोंदले गेले आहेत.

फेक न्यूज आणि अफवांच्या प्रकारात २१४ टक्के वाढ झाली आहे. २०२० मध्ये फेक न्यूजचे १ हजार ५२७ गुन्हे नोंदले गेले आहेत. ही संख्या २०१९ मध्ये ४८६ होती आणि २०१८ मध्ये हीच संख्या २८० होती, असेही एनसीआरबीच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे.

The incidence of religious and ethnic riots in the country doubled in 2020, with the figures rising due to the Delhi riots

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात