विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतात अद्यापही पोलीसांकडून होणारे अत्याचार कमी झालेले नाहीत. मानवी हक्कांसाठी सर्वात जास्त धोका पोलीस ठाण्यांमध्ये आहे. अगदी प्रतिष्ठितांनाही थर्ड डिग्रीचा सामना करावा लागतो. त्यामुळे पोलीस अधिकाºयांनी आणखी संवेदनशील होण्याची गरज भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही रमण यांनी व्यक्त केली.The highest threat to human rights is in police stations, Chief Justice N. V. Raman’s opinion
न्या. रमणा म्हणाले, पोलीस ठाण्यांमध्ये अत्यापही शारीरिक अत्याचार केले जातात. मानवी हक्कांची पायमल्ली होती. कोठडीतील छळाच्य घटना घडतात. अनेकांना तातडीने कायदेशिर मदत मिळत नाही हे त्याचे कारण आहे. अगदी प्रतिष्ठितांनाही पोलीसांकडून थर्ड डिग्रीचा सामना करावा लागतो, याची उदाहरणे समोर आली आहेत.
पोलीसांकडून होणारे अतिरेक रोखण्यासाठी नागरिकांना त्यांचे घटनात्मक अधिकार आणि मोफत कायदेशिर मदत मिळाली पाहिजे. यासाठीच्या सेवांच्या उपलब्धतेचा प्रसार करायला हवा. प्रत्येक पोलीस ठाण्यात बोर्ड लावणे हे पहिले पाऊल ठरेल.
न्या. रमणा म्हणाले, न्यायाचे राज्य हवे असेल तर विशेषाधिकार असणारे आणि दुर्बल यांना वेगवेगळा न्याय असून चालणार नाही. न्यायव्यवस्थेला नागरिकांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्यासाठी काम करावे लागेल. अनेकांना न्याय मिळत नाही. न्यायालयासमोर सर्व जण समान आहेत, या तत्वाचे पालन करायला हवे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App